esakal | नवलच... दुष्काळ जाहीर करण्याविरोधात आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Drought declare

महसूल अधिकाऱ्यांनी उंबरठा उत्पादन घेण्यात दाखविलेला निष्काळजीपणा असतो. यास वाचा फोडण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याविरोधात कृषिभूषण शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला मंगळवारी (ता. ४) निवेदन दिले. 

नवलच... दुष्काळ जाहीर करण्याविरोधात आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कापडणे : राज्यात नेहमीच दुष्काळाची छाया असते. काही जिल्ह्यांना तर दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असतो. दुष्काळ घोषित होवूनही नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळत नाही. विमाही अत्यल्प मिळतो. यास महसूल अधिकाऱ्यांनी उंबरठा उत्पादन घेण्यात दाखविलेला निष्काळजीपणा असतो. यास वाचा फोडण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याविरोधात कृषिभूषण शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला मंगळवारी (ता. ४) निवेदन दिले. 
निवेदनात म्‍हटले आहे की, पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आहे. परंतु धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणेसाठी अत्यंत नुकसानीची आहे. दुष्काळी मदत मिळण्यासाठी सतत जिल्ह्यातील ग्रामस्तर ते जिल्हा स्तरावरील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व दरवर्षी दुष्काळी मदत मिळावी. म्हणून प्रशासनावर दबाव टाकतात. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक हे पण शेतकऱ्यांना फायदा व्हावा. यासाठी पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी वास्तव पेक्षा अतिशय कमी दाखवितात. यामुळे पीक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन मागील पाच वर्षापासून ही अत्यंत कमी झालेली आहे. बेटावद महसूल मंडळाचे कापसाचे उंबरठा उत्पादन प्रती हेक्टरी पावणे पाच क्विंटल आहे. यापेक्षा कमी उत्पादन आले तरच व तेवढीच नुकसान भरपाई मंजूर होईल. या कारणांमुळे जिल्हा वास्तव पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित झालेला आहे. भविष्यात चांगली नुकसान भरपाई मिळण्यासाठी वास्तव  उंबरठा उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. हे उंबरठा उत्पादन वाढविणेसाठी दुष्काळ न दाखविता शंभर पैसे पर्यंत आणेवारी दाखवावी. 
याबाबत आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, कृषी सभापती बापू खलाणे, जिल्हाधिकारी यादव आदींना निवेदन दिले.  निवेदनावर अॅड. प्रकाश पाटील, कृषिभूषण दिलीप पाटील वडणे, सुधाकर बेंद्रे (धुळे), सुदीप पाटील (मुकटी), ललित देवरे (साक्री), कृषिभूषण प्रभाकर चौधरी (धुळे), आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील (सोनगीर), जनार्दन पाटील (शिरपूर), अरुण पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.