दोंडाईचात भरवस्तीत घरफोडी..सात लाखांचा ऐवज चोरांंनी लांबविला

Thief News: पुन्हा धाडसी घरफोडी झाल्याने आमदार रावलांच्या तक्रारीला पुष्टी मिळाली.
Thief
Thief
Updated on

दोंडाईचा ः शहरातील शिवाजीनगरमधील अंडाभुर्जी विक्रेत भूषण खारकर यांच्या घराचे कुलूप तोडून रोकडसह ७० ते ८० ग्रॅम सोन्याचे दागिने, असा एकूण सहा ते सात लाखांचा ऐवज लंपास चोरट्यांनी (Thief) केला. याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात (Dondaicha Police Station) गुन्हा नोंदविला असून या घटनेमूळे दोंडाईचा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Thief
जळगावात पाकिस्तानी काडतुसांसह विदेशी पिस्तूलधारी अटकेत

शहरात चौफुलीवर हातगाडीवर अंडाभुर्जी पावभाजी विक्री करणारे खारकर यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने घराला कुलूप लावून परिवारासह धुळे येथील दवाखान्यात गेले. ते रात्री परत न आल्याने रात्री चोरांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला व कपाटातील एक लाख ८० हजार रुपये आणि ७० ते ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले. सकाळी आठच्या सुमारास शहनाज खाटीक यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने ते तपासासाठी त्यांच्या घरात गेल्या, तेव्हा त्यांना घरात कोणीच दिसले नाही व घरातील सामान अस्ताव्यस्त दिसल्यामुळे घरफोडी झाल्याची माहिती भूषण खारकर यांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष लोले तत्काळ आले. श्वान, ठसेतज्‍ज्ञांना बोलावून नमुने घेतले. या घटनेची रात्री उशीरा नोंद करण्यात आली.

Thief
शिरवेलवरून परतणाऱ्या जळगावच्या भाविकांच्या गाडीचा अपघात

आमदार रावल यांची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या येथील जनआशीर्वाद यात्रेतही गर्दीचा फायदा घेत काही लोकांच्या खिशातून पाकीट मार झाल्याचीही पोलिसांत तक्रार झाली. याची दखल घेत आमदार जयकुमार रावल यांनी रविवारी (ता. २२) पोलिस अधीक्षकांकडे मेलद्वारे तक्रार केली असताना, पुन्हा धाडसी घरफोडी झाल्याने आमदार रावलांच्या तक्रारीला पुष्टी मिळाली. त्यामुळे या तपासाचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com