एकत्रित प्रयत्नातून कोरोनाला हरवू या 

रमाकांत गोदराज
Monday, 17 August 2020

राज्य शासनाच्या ‘मिशन बिगिन अगेन’चे सकारात्मक परिणाम दिसत असून, लवकरच जनजीवन सुरळीत होईल, असा विश्‍वास श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.

धुळे ः गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाने सर्वांनाच वेठीस धरले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी लोकसहभागाची नितांत गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिकांनी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाला सहकार्य करून कोरोना विषाणूची साखळी खंडित करावी. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोनावर निश्‍चितपणे विजय मिळवू, असे प्रतिपादन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. १५) येथे केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्टनिमित्त शनिवारी (ता. १५) पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सी. वान्मती, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार म्हणाले, की कोरोनाला संपूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी लोकांचा सहभाग गरजेचा आहे. राज्य शासनाच्या ‘मिशन बिगिन अगेन’चे सकारात्मक परिणाम दिसत असून, लवकरच जनजीवन सुरळीत होईल, असा विश्‍वास श्री. सत्तार यांनी व्यक्त केला. 

शिवभोजन योजना यशस्वी 
राज्य शासनाची शिवभोजन योजना लॉकडाउनच्या काळात चांगलीच यशस्वी ठरली. जिल्ह्यातील १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून दोन लाख २० हजार गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला. याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून एप्रिल ते जुलै या कालावधीत २५ हजार ४८३ टन गहू, ३९ हजार ७८ टन तांदूळ, ८२८ टन डाळीचे पात्र लाभार्थ्यांना वितरित केले. राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या, स्थलांतरित, बेघर मजुरांना प्रतिव्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. पीकविमा, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना मदत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदी विविध योजनांतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याचेही पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. 

 

या ‘कोरोना’योद्ध्यांचा झाला सत्कार 

*शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ः डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. दीपक शेजवळ, गणेश वाघोरे, विद्या गुडवाल, सुहासिनी गावित, संतोष चौधरी, विजय सारवान, राजरत्न अहिरे. महापालिका ः डॉ. एम. आर. शेख, डॉ. प्रशांत मराठे, मनोहर सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, भरत येवलेकर, विकास सावळे, 
इफ्तेखार उस्मान, मुन्ना मन्वर, प्रियांका वसावे, नीता चौधरी. 
*जिल्हा परिषद (आरोग्य विभाग) ः डॉ. हितेंद्र देशमुख, आरोग्यसेविका सखूबाई बागूल, आरोग्यसेवक शरद खैरनार, आशा कार्यकर्त्या मनीषा मराठे, अंगणवाडी कार्यकर्त्या तुळसाबाई पाटील, परिचर अभिषेक गायकवाड, नाझीम बेग रहीम बेग मिर्झा. 
*जिल्हा रुग्णालय ः डॉ. विशाल पाटील, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. ध्रुवराज वाघ, डॉ. अर्जुन नरोटे, दीपाली मोरे, तृप्ती आरोळे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभय शिनकर, तुषार पवार, रशीद अन्सारी. 
*स्वयंसेवी व्यक्ती-संस्था-संघटना ः अनुप अग्रवाल, राजेंद्र वालचंद शिंदे, राजेंद्र बंब, शाहबाज फारूख शाह, जी. एम. धनगर, धनंजय सोनवणे, योगेश राऊत, कुमारपाल कोठारी. 
*डॉक्टर क्लब शिरपूर, दोंडाईचा, बी. व्ही. पाटील (शिरपूर), तुषार पवार (शिंदखेडा). 
*थाळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, हवालदार ज्ञानेश्वर पाटील, डॉ. गिरीश ठाकरे, आसिफ दौलत पटेल (कोरोना विषाणूवर मात). 
*जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी क्षेत्र, धुळे), कृष्णा राठोड आदी कोरोनायोद्ध्यांचा पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
*श्रमिकांना स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या मदतीचा, कोटा येथील विद्यार्थ्यांना परत आणण्यात एसटीच्या धुळे विभागाच्या योगदानाचाही श्री. सत्तार यांनी आवर्जून उल्लेख केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Flag waving ceremony at Dhule Collectorate