पुन्हा पेटू लागल्‍या चुली; कारण ऐकलात व्हाल थक्‍क

महेंद्र खोंडे
Friday, 11 September 2020

घरगुती सिलींडरचे दर या आठवड्यात ६५० रूपयांवर जावून धडकले. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून लॉकडाउनमुळे रोजगार नसल्‍याने सिलिंडरसाठी पैसे जगविताना दमछाक होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नसून सिलिंडर खरेदीवेळी पुर्ण रक्‍कम द्यावी लागते.

तऱ्हाडी (धुळे) : केंद्र सरकारच्या उज्‍वला योजनेतंर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्‍थ्‍यांना शंभर रूपयांच्या सवलतीत उज्‍वला गॅसजोडणी मिळाली. मात्र, सिलींडरचे भाव आता साडेसहाशेवर भिडल्‍याने गृहिणींचे स्‍वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. शंभरीतील गॅस आता नाकापेक्षा मोती जड असा झाला आहे. यामुळे गावागावात, आदिवासी भागात पुन्हा चुली पेटल्‍या आहेत.
घरगुती सिलींडरचे दर या आठवड्यात ६५० रूपयांवर जावून धडकले. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून लॉकडाउनमुळे रोजगार नसल्‍याने सिलिंडरसाठी पैसे जगविताना दमछाक होत आहे. घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकाला मार्चपासून सबसिडी दिली जात नसून सिलिंडर खरेदीवेळी पुर्ण रक्‍कम द्यावी लागते. अनेक वेळा सामान्य नागरीकांकडे एकत्र रक्‍कम नसते. स्‍वयंपाकासाठी सर्वसामान्य नागरिक काही वर्षापुर्वी चूल किंवा स्‍टोव्हचा वापर करीत होते. हळूहळू काळ बदलला अन्‌ श्रीमंतांप्रमाणे सामान्य घरातही गॅसजोडणी आली. मागील काही वर्षात शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर गॅसजोडणीधारकांची संख्या वाढली.

मार्चपासून सबसिडी बंचद
चुलीवरील स्‍वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर व्हायचा. वृक्षतोड होत होती. वृक्षतोड कमी व्हावी, महिलांना सरपणातून निघणाऱ्या धुरापासून मुक्‍ती मिळावी, यासाठी सरकारने गॅसजोडणी सवलतीच्या दरात दिली. काही वर्षात सातत्‍याने होणारी सिलींडरची दरवाढ सामान्यांसाठी चिंतेचे कारण झाली. शासनाकडून नियमाप्रमाणे घरगुती सिलींडरसाठी अनुदान लाभार्‍थ्‍यांच्या बँक खात्‍यात जमा होते. मात्र मार्चपासून सबसिडी आणि अनुदानही नाही. बुकिंग केल्‍यानंतर सिलिंडर घेताना एकूण रक्‍कम ग्राहकांना द्यावी लागते. मात्र मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या व्यक्‍तीला एकाच वेळी ही रक्‍कम भरणे अवघड झाले आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule gas cylinder high rate and home budget collapse