esakal | ग्रामपंचायत निवडणुकीची लगीनघाई 
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

जिल्ह्यात दीडशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू आहे. पंचायतींत दिसणारी गर्दी प्रशासकामुळे विरली आहे. आता इच्छुकांसह ग्रामस्थांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीची लगीनघाई 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : मार्च ते ऑगस्टपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक हालचाली गतिमान झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील दीडशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारयाद्यांचे अद्यतीविकरण व वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे. काही धुरंदर राजकारणी याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी माहिर आहेत. ते अधिक वेळ अचूक निरीक्षणात गुंतलेले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याचे महसूल यंत्रणेत चर्चिले जात आहे. निवडणूकपूर्व हालचालींची लगीनघाई सुरू झाली आहे. 

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मतदान 
जिल्ह्यात दीडशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज सुरू आहे. पंचायतींत दिसणारी गर्दी प्रशासकामुळे विरली आहे. आता इच्छुकांसह ग्रामस्थांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. मतदार याद्यांचे सार्वजनिक वाचन होत आहे. त्यावर हरकती व सुनावणी आणि त्यानंतर निवडणूक होईल. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जातेय, तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे. 

यादीत फेरफार? 
गावागावांतील काही पोचलेले राजकारणी याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी माहीर आहेत. ते याद्यांचा अचूक अभ्यास करून सोयीनुसार छेडछाड करीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

त्यांचा नमस्कार, चमत्कार वाढला 
मतदारांशी नाड जोडलेली नसलेले आणि हौशी इच्छुकांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. त्यांनी दिवसांतून अगणित वेळा भेटेल त्यास नमस्कार आणि गावात विकासाचा चमत्कार करणार असल्याचे बिंबवत आहेत. 

कापडणे ग्रामपंचायतीत वाचन 
येथील ग्रामपंचायतीत तलाठी विजय बेहरे आणि कोतवाल रवींद्र भामरे यांनी मतदार याद्यांचे वाचन केले. ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र माळी, महेंद्र पाटील, गोलू पाटील, भूषण शिंदे, विशाल शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. 

प्रभाग यादीनुसार मतदारसंख्या 
यादी क्रमांक/ पुरुष/महिला/ एकूण 
६२ / ६१९ / ५७९/ ११९८ 
६३ / ५६९ / ५३७ / ११०६ 
६४ / ५४७ / ४९२ / १०३९ 
६५ / ५७२ / ५०५ / १०७७ 
६६ / ४९७ / ४१२ / ९०९ 
६७ / ५८५ / ५१३ / १०९८ 
६८ / ६२७ / ५७३ / १२०० 
६९ / ७५२ / ७१६ / १४६८ 
७० / ६३० / ९१६+१/ १२४७ 
यादीत सत्तरमध्ये एका तृतीयपंथीची नोंद आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image