महामार्गावरील अर्धवट काम...दहा हेक्टरवर शेतात पाणीच पाणी 

तुषार देवरे
Tuesday, 4 August 2020

महामार्गाच्या अर्धवट कामामुळे येथील शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी महामार्ग खचला आहे. नाल्याचे पाणी निघण्यासाठी पाहिजे

देऊर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कुसुंबा (ता. धुळे) गावाजवळ मुसळधार पावसामुळे बोराटी नाल्याला पाणी आले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामामुळे पाणी निघण्यास अडचण येत असल्याने महामार्गलगत असलेल्या शेतात थेट पाणी घुसले.

हेही पहा - युवतीची हिम्‍मत पहा...एक लाख घेतले आता म्‍हणतेय लग्‍न नाही करायचे​
 

नैसर्गिक, कृत्रिम नुकसानीमुळे या शिवारातील दहा शेतकऱ्यांचे सुमारे दहा हेक्टरवर भाजीपाला, कपाशी, कांदा, मिरची, बाजरी, मका,भुईमूग आदी पिकांचे सुमारे बारा लाखांवर नुकसान झाले आहे. शेतकरी मनोहर बडगुजर यांचे शंभर क्‍विंटल कांदा पाण्यात भिजून खराब झाला. महामार्गाच्या अर्धवट कामामुळे येथील शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी महामार्ग खचला आहे. नाल्याचे पाणी निघण्यासाठी पाहिजे तशी पुरेशी जागा नसल्याने पाणी उलट थेट शेतात जात आहे. यामुळे शेतात उभे खरीप पिके खराब होत आहे. आगामी येणारे उत्पादन शून्यावर आले आहे. 

नुकसान भरपाई कोन देणार 
राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. आता झालेल्या नुकसानीस प्रशासनाने समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्‍यक्‍त केली आहे. दरम्यान दोन दिवसांपासून शेती पिकांच्या नुकसानीचा पंचनामा तलाठी एस. जी. सूर्यवंशी, कृषी साहाय्यक अश्विनी चौधरी, कोतवाल लोटन कोळी, लक्ष्मण माळी, पंच जगदीश माळी, अमोल जाधव करत आहेत. मोहन परदेशी, गोदाबाई परदेशी, प्रशांत शिंदे, शंकर परदेशी, विश्वास परदेशी, रेणुबाई भिल, प्रमिलाबाई अहिरे, गुलाब पाटील, कैलास पाटील मनोहर बडगुजर आदी शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule highway work incomplete and rain water in farm