अगोदर समलैंगिक संबंध; क्‍लिपद्वारे ब्‍लॅकमेलिंग म्‍हणून केला खुन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

समलैंगिक संबंध होते. जलालने समलैंगिक संबंधाच्या व्हिडिओ क्लिपद्वारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केल्याने त्याचा २८ सप्टेंबरला खून केल्याचे चौकशीत सलमानने सांगितले.

धुळे : समलैंगिक संबंधाची मागणी करत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तरुणाचा गळा आवळून खून झाल्याची घटना मोहाडी परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 
मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डेडरगाव तलाव आहे. तेथून शंभर मीटरवर ३० सप्टेंबरला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपासावेळी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकजण बेपत्ता असून, तशी तक्रार आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांना मृत व्यक्तीचे छायाचित्र आणि कपडे दाखविले असता त्यांनी ते ओळखले. नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत यांनी मोबाईलवरून शोध घेतला असता, मृत तरुण जलाल अन्सारी (वय ३०, रा. शब्बीरनगर, शंभरफुटी रोड, धुळे) असल्याचे स्पष्ट झाले. 

दोघांचे होते संबंध
जलाल कुणाच्या संपर्कात होता, याचा उलगडा झाला. त्यात सलमान अन्सारीचे (रा. वडजाई रोड, धुळे) नाव पुढे आले. त्याची माहिती मोहाडी पोलिसांनी संकलित केली. त्यात जलाल आणि सलमानमध्ये समलैंगिक संबंध होते. जलालने समलैंगिक संबंधाच्या व्हिडिओ क्लिपद्वारे ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केल्याने त्याचा २८ सप्टेंबरला खून केल्याचे चौकशीत सलमानने सांगितले. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक मिर्झा, हवालदार प्रभाकर ब्राह्मणे, श्‍याम काळे, कांतिलाल शिरसाट, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, गणेश भामरे, धीरज गवते यांनी तपास केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule homosexual relationship matter and boys murder