esakal | धुळे सिव्हिलचा साठा संपला; हिरे मेडिकलला तुटवडा

बोलून बातमी शोधा

dhule civil

धुळे सिव्हिलचा साठा संपला; हिरे मेडिकलला तुटवडा

sakal_logo
By
निखिल सुर्यवंशी

धुळे ः सरकार पातळीवरूनही रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा कुठलाही साठा उपलब्ध होत नसल्याने येथील चक्करबर्डीतील हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात मोठा तुटवडा निर्माण झाला असून, साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) सोमवारी एकही इंजेक्शन शिल्लक नसल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. शासकीय रुग्णालयांच्या या स्थितीमुळे कमालीची चिंता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: जखमेवर मीठ चोळले; धुळे जिल्ह्याला फक्त ७२ रेमडेसिव्हिर

तुटपुंजा साठा

हिरे मेडिकलला रोज किमान शंभर, तर सिव्हिल हॉस्पिटलसह कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालयांना मिळून रोज किमान दोनशेवर इंजेक्शनची गरज भासत आहे. सद्यःस्थितीत सरकारने विविध कंपन्यांकडून जिल्ह्याला निर्धारित झालेल्या १.२४ टक्के इंजेक्शन कोट्यातूनच हिरे मेडिकल व सिव्हिलला तुटपुंजा साठा दिला जात आहे. दरम्यान, हिरे मेडिकलने सोमवारी विविध कंपन्यांशी संपर्क साधत दहा हजार इंजेक्शनच्या साठ्याची मागणी नोंदविली.

हेही वाचा: धुळ्यात ‘संचारबंदी’ची लागली वाट; ‘तू तू, मैं मैं’ आणि खोळंबा !

सनेर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांनी तत्काळ आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध पुरवठामंत्री राजेंद्र शिंगणे यांना सोमवारी ई-मेल पाठवत स्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. मंत्र्यांनी किमान हिरे मेडिकलला रोज दोनशे, सिव्हिलला रोज तीनशे आणि जिल्ह्यासाठी रोज सरासरी अडीच ते तीन हजार इंजेक्शन दिली, तर स्थिती नियंत्रित राहील, याची जाणीव श्री. सनेर यांनी करून दिली आहे. हिरे मेडिकल, सिव्हिलला सरकारने तत्काळ मागणीप्रमाणे साठा पुरविला, तर जिल्ह्याला निर्धारित १.२४ टक्के कोट्यातून शासकीय रुग्णालयांना इंजेक्शन देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे असे इंजेक्शन घोषित कोविड सेंटरला अधिक प्रमाणात मिळू शकेल, असे श्री. सनेर यांनी सांगितले.

img

remdisivhir

संपादन - भूषण श्रीखंडे