esakal | जमिनीचा मोबदला नाही; शेतकऱ्यांचे धरणाजवळच उपोषण
sakal

बोलून बातमी शोधा

jamgad dam

जामफळ प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून प्रकल्पांतर्गत शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जात असली तरी अद्याप ती संपादित करण्यात आली नाही. शेतीची मोजणी झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना त्‍याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही.

जमिनीचा मोबदला नाही; शेतकऱ्यांचे धरणाजवळच उपोषण

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : तापी नदीतून जामफळ प्रकल्प भरुन घेणाऱ्या योजनेंतर्गत बुडीत क्षेत्रातील शेत जमिनी शासन कवडीमोल किंमतीत घेत असून बाजारभावाप्रमाणे दर त्वरीत मिळावा; या मागणीसाठी आज (ता. ४) शेतकऱ्यांनी जामफळ धरणाजवळ उपोषण केले. लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
जामफळ प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून प्रकल्पांतर्गत शेकडो शेतकऱ्यांच्या शेती जात असली तरी अद्याप ती संपादित करण्यात आली नाही. शेतीची मोजणी झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना त्‍याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून त्यांचा धीर सुटला आहे. लवकरच शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास आमरण उपोषण व  त्यानंतर धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला.

शासन पुर्ण पैसे देण्यास नाही तयार
शेतीचा एकरी भाव आठ ते सव्वा आठ लाख रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले. मात्र उर्वरित शेतकऱ्यांची काळी, कसदार व बागायती शेतीला १५ ते १६ लाख रुपये एकर बाजारभाव असल्‍याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र शासन तेवढे भाव देत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले असून त्यांचे उत्पन्नाचे व उदरनिर्वाहाचे साधन तर गेले आता मिळेल त्या रक्‍कमेत उर्वरित आयुष्य घालवायचे आहे. म्हणूनच ती रक्कम पुरेशी असावी अशी मागणी आहे. 

अशा केल्‍या आहेत मागण्या
शेतीला बाजारभाव मिळावे, फळझाडे व अन्य झाडांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरीत सामावून घेणे, अकृषक क्षमतेची जमीन असल्याने नवीन कायद्यानुसार चार पट मोबदला मिळावा, शेतजमीन व पीक मुल्यांकनात त्रुटी निर्माण करणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. कोरोना व जमावबंदीमुळे केवळ पाच शेतकऱ्यांना उपोषणाची परवानगी जिल्हाधिकारींनी दिली. त्यानुसार जामफळ धरणाशेजारी मारुती मंदिराच्या मागे शेतकरी केदारेश्वर मोरे, आर. के. माळी, दिनेश देवरे, श्याम माळी, भुषण मोरे, समाधान पाटील, निलेश बडगुजर, प्रवीण पाटील, पंकज पवार, हर्षल परदेशी, मनुकुमार पटेल आदींनी लाक्षणिक उपोषण केले.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top