‘जवाहर'मध्येही ‘कोरोना टेस्ट'ची सुविधा 

रमाकांत घोडराज
Monday, 7 December 2020

कोरोनाचे संकट आल्यानंतर १५ ऑगस्टपासून जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. त्याद्वारे रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात येत आहेत.

धुळे : जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ लॅब सुरू करण्यात आली आहे. कार्यान्वित झाली उदघाटन झाले. या लॅबमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना अल्पदरात चाचणी करता येईल तसेच चाचणीचा रिपोर्ट एकाच दिवसात मिळू शकणार आहे. 

कोरोनाचे संकट आल्यानंतर १५ ऑगस्टपासून जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले. त्याद्वारे रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, नुकतेच महाविद्यालयातील मॉलेक्युलर प्रयोगशाळेस ‘इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) व ‘नॅशनल ॲक्रीडीएशन बोर्ड ऑफ टेस्टींग अँड कोल्याब्युरेशन लॅबरोटरीज’ (एनएबीएल) कडून मान्यता मिळाली. या लॅबचे आज (ता. ७) फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, उपअधिष्ठाता डॉ. आरती कर्णिक-महाले, डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामनी, पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. द्रविड, मेडिकल सुपरीटेंडंट डॉ. आर. व्ही. पाटील, फार्माकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. ए. डब्ल्यू. पाटील, डॉ. मधुकर पवार, कोविड लॅबच्या प्रमुख डॉ. करुणा अहिरे, प्रशासन अधिकारी राकेश कुकस्ते आदी उपस्थित होते. लॅबच्या माध्यमातून आज (ता.७) पासुनच कोविडसाठी अतिमहत्त्वाची असणारी आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी सुरू करण्यात आली. 

रुग्णांसाठी सुलभ व्यवस्था 
कोविड-१९ ची चाचणी लॅबमध्ये अतिशय अल्प दरात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रुग्णांचे नमुने धुळे शहरातील कोणत्याही हॉस्पिटल, क्लिनिक तसेच थेट रुग्णाच्या घरून देखील घेता येणार आहेत. धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या अनुषंगाने उपलब्ध केलेल्या या सुविधेचा घ्यावा असे आवाहन जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule javahar medical collage start corona testing