मुसळधार पावसाने घर खचले अन आढळले भुयार

जगन्‍नाथ पाटील
Saturday, 25 July 2020

काॅक्रीटचे घर खचले. घरातच एक मोठा खड्डा पडला. वीस फुट खोलीचा माठाच्या आकाराचे भुयार आढळले. पाच वर्षांपुर्वी या घरालगतच माठाच्या आकाराचे भुयार सापडले होते.

कापडणे (धुळे)  : येथे तेवीस जुलैच्या मध्यरात्री दोन तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे बाळू कडू पाटील या शेतकर्‍याचे काॅक्रीटचे घर खचले. घरातच एक मोठा खड्डा पडला. वीस फुट खोलीचा माठाच्या आकाराचे भुयार आढळले. पाच वर्षांपुर्वी या घरालगतच माठाच्या आकाराचे भुयार सापडले होते. मुसलमान राजवटीत धान्य लपविण्यासाठीचे असे भुयारी कोठार असायचेत. गेल्या वीस वर्षांत हे नववे भुयारी कोठार आढळले आहे.

बाळू पाटील यांच्या घरात हे भुयारी कोठार आढळले आहे. वीस फुट खोल आणि माठाच्या आकाराचे आहे. पाच वर्षांपुर्वी याच भुयाराच्या रांगेत प्रा.अरविंद पाटील यांच्या घराचे खोदकाम सुरु असतांना भुयार सापडले होते. गावपोळ गल्ली परीसर, धनूर रस्त्यालगत व माळी समाज पांढरी या भागात आतापर्यंत नऊ भुयार सापडले आहेत.

धान्याचे कोठारच ?
मुसलमान राजवाटीत धनधान्याची सक्तीने वसुली व्हायची. तत्कालीन लोकांनी भुयारी धान्याचे कोठार तयार करीत. तिथे धान्य लपविले जात असल्याचे वयोवृध्दांनी सांगितले. तर कापडणे स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. भुमिगत स्वातंत्र्य सैनिकांना लपण्यासाठी हे कोठार कामी आल्याचे जाणकारांनी सांगितले. दरम्यान पुरातत्व विभागाने या भुयारांची पाहणी करावी. भुयारी मागचे गुपित उलगडावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule kapdane village heavy rain house drop