बिलाडीचे गुरूजींचा प्रवास डेप्युटी सीईओपर्यंत

डीएड झाल्यानंतर उधळी ता.रावेर येथील जिल्हा परीषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते.
बिलाडीचे गुरूजींचा प्रवास डेप्युटी सीईओपर्यंत




कापडणे : पंधरा वर्षांपूर्वी गुरूजी होणे. हे मोठे भाग्याचे लक्षण समजले जात होते. गुरुजी (Teacher)होण्यासाठी मोठी धडपड सुरू असायची. डीएड आणी बीएड हे कला शाखेचे मेडीकल समजले जात असे. काळ बदलत गेला. अन तरूणांची (Young) स्वप्नेही विशाल होत गेली. बिलाडी ता.धुळे येथील सचिन शिंदे हे तरूण गुरूजींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महिला बाल कल्याण अधिकारी झाले. सध्या ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून (Deputy CEO) कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचा सत्कार बिलाडीतील तरूणांनी केला. अन अधिकारी होण्याचा संकल्पही सोडला.

बिलाडीचे गुरूजींचा प्रवास डेप्युटी सीईओपर्यंत
अंजनी प्रकल्पात 80 टक्के जलसाठा..सिंचनाची समस्या दूर


धुळे जिल्हा परीषदेत महिला व बालकल्याण विभागाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असलेले सचिन शिंदे यांचा. तरूणांनी वृक्षरोप भेट देवून सत्कार केला. यावेळी अक्षय पाटील, जितेंद्र शिंदे, मयुर अहिरे, दिनेश धनगर, उमेश जाधव, अक्षय जाधव, विशाल पिंपळे आदी उपस्थित होते.

बिलाडीचे गुरूजींचा प्रवास डेप्युटी सीईओपर्यंत
पिस्तूल, चाकूच्या धाकावर रोमिओचा मुलीच्या घरासमोर धिंगाणा



दरम्यान सचिन भास्कर शिंदे यांनी डीएड झाल्यानंतर उधळी ता.रावेर येथील जिल्हा परीषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते. मात्र मनातील जिद्द आणि आईवडिलांचे मार्गदर्शन आणि प्रेरणेतून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. घवघवीत प्रेरणादायी यशही मिळविले. शिंदे यांची चार वर्षांपूर्वी महिला बाल कल्याण अधिकारीपदी निवड झाली. आता धुळे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहे. त्यांच्या मुळगावी समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com