esakal | मदतीचे हात सरसावले...हाती मिळाला ॲन्‍ड्रॉईड मोबाईल; ‘विशाल’ स्‍वप्‍नांचे आकाश मोकळे
sakal

बोलून बातमी शोधा

vishal pawra navoday study

शेत शिवारातील झोपडीत राहणाऱ्या विशालचा लॉकडाउनमुळे ऑनलाइन अभ्यास अँड्राईड मोबाईल अभावी अभ्यास बुडत होता. तो सुरु झाल्याने शिक्षणप्रेमी आणि दात्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. 

मदतीचे हात सरसावले...हाती मिळाला ॲन्‍ड्रॉईड मोबाईल; ‘विशाल’ स्‍वप्‍नांचे आकाश मोकळे

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : येथील विशाल पावरा जवाहर नवोदय परीक्षेतील गुणवत्ता यादीत आला. विद्यालयात प्रवेश मिळाला. लॉकडाउनमुळे शाळा बंद असली तरी ऑनलाइन अभ्यास सुरू झाला आहे. विशालची परिस्‍थिती पाहता ‘सकाळ’ने अभ्यासासाठी ‘कुणी मोबाईल देता का मोबाईल’ हे वृत्त प्रसिध्द केले. त्‍याला प्रतिसाद देत, मदतीसाठी हात समोर आले; विशालल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ब्रॅन्डेड कंपनीचा मोबाईल मिळाला. अन्‌ विशालसह त्याच्या आई वडिलांचाही आनंद विशाल झाला. 

शेत शिवारातील झोपडीत राहणाऱ्या विशालचा लॉकडाउनमुळे ऑनलाइन अभ्यास अँड्राईड मोबाईल अभावी अभ्यास बुडत होता. तो सुरु झाल्याने शिक्षणप्रेमी आणि दात्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. 

अनामिक दात्यांनी सोडविला प्रश्न 
एकीकडे नावासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांची संख्या कमी नाही. परंतु मदतीचा हात देऊनही नाव कुठे येऊ नये अशाही व्‍यक्‍ती आज समाजात असल्याचा प्रत्यय आला. आर्मीत सेवेत असलेला आणि मालेगाव तालुक्यातील एका जवान, आणि जळगाव शहरातील शासकीय सेवेत असलेल्या महिलेने पाठविलेल्या मदतीतून विशालच्‍या मोबाइलचा प्रश्‍न सुटला आहे. तसेच पाचोरा येथील रजनी शरद पाटील यांनीही विशालच्या शैक्षणिक खर्चासाठी हजार रुपयांची मदत केली आहे. 

मी आयुष्यभर कृतज्ञ 
कोरोना काळात रोजगाराचा प्रश्‍न आहे. मोबाईलसाठी पैसे नसताना मदत करणारे दाते समोर आले त्‍यांचे उपकार स्मरणात राहतील. आयुष्यभर कृतज्ञ राहू; असे विशाल पावरा व त्याच्या आईवडिलांनी सांगितले. 
 
परिस्थितीमुळे विशालच्या अभ्यासात अडसर येऊ नये. त्याला बळ, प्रेरणा मिळावी, म्हणून मदत केली आहे. भविष्यातही मदत करेन. कृपया माझे नाव प्रसिद्ध करू नये. करायचे असेल, तर आर्मीतील एक सच्चा हिंदूस्थानी जवान असेच प्रसिद्ध करा. 
- आर्मीतील एक जवान 


संपादन ः राजेश सोनवणे

loading image