पुरमेपाडा सीमेवर खडसेंचे पहिले स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

आतषबाजीत त्यांचे स्वागत होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, धुळे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, महेंद्र शिरसाट आदी शहरासह ग्रामीणचे नियोजन करत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. 

धुळे : भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईहून शनिवारी (ता.२४) धुळेमार्गे कारने जळगावकडे रवाना होतील. त्यांचे पक्षाच्या येथील शाखेतर्फे पहिले स्वागत पुरमेपाडा (ता. धुळे) सीमेवर दुपारी चारला होईल. तसेच पारोळा रोडवरील मुकटी (ता. धुळे) येथे सायंकाळी साडेसहाला श्री. खडसे यांची जंगी सभा होईल. 
विविध मार्गांवर श्री. खडसे कार्यकर्त्यांतर्फे सत्कार स्वीकारतील. तेथे आतषबाजीत त्यांचे स्वागत होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष रणजित भोसले, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, धुळे तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, महेंद्र शिरसाट आदी शहरासह ग्रामीणचे नियोजन करत असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. 

खडसेंचे असे स्वागत 
श्री. खडसे यांच्या विविध मार्गावरील स्वागताचे नियोजन असे ः पुरमेपाड्याला दुपारी चार, अवधानला दुपारी साडेचार, चाळीसगाव चौफुलीला सायंकाळी पाच, पारोळा चौफुलीवर सायंकाळी साडेपाच, फागण्याला सायंकाळी सहा, मुकटीला सायंकाळी साडेसहाला सभा. या ठिकाणी कार्यकर्ते विनोद बच्छाव, अतुल जाधव, संदीप देवरे, मच्छींद्र शिंदे, कुणाल वाघ, सय्यद सरदार, महेंद्र शिरसाट, राजू चौधरी, प्रवीण पाटील, कैलास पाटील, कैलास वडगाव, डॉ. राहुल कुवर, राजू पाटील आदी जबाबदारीनुसार नियोजन आणि स्वागत करतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule khadse rashtrawadi entry first program dhule district