esakal | नकली सोन्यापासून सावधान; आपट्याचे, अंजन, कांचन झाडाची पाने दिसताच सारखी !
sakal

बोलून बातमी शोधा

नकली सोन्यापासून सावधान; आपट्याचे, अंजन, कांचन झाडाची पाने दिसताच सारखी !

आपट्याची पानांसारखी दिसणारे कांचन, अंजन झाडांची दसर्याला जुळ्या भावाची नाहक कत्तल होते. विनाकारण आपट्यासोबत या झाडांची कत्तल होते.

नकली सोन्यापासून सावधान; आपट्याचे, अंजन, कांचन झाडाची पाने दिसताच सारखी !

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : साडेतीन मुहूर्तापैकी असलेल्या विजयादशमी , दसरा सणाला स्नेह, आपुलकी वृद्धींगत करण्यासाठी आपट्याची पाने घरोघरी एकमेकांना जाऊन दिली जातात. मात्र सध्या बाजारात आपट्याची पानांसारखी दिसणारी प्रतिरूप अंजन, कांचन आदि प्रकारची पाने काही वर्षापासून सर्वत्र विक्रीस येत आहे. आपट्या संबंधित पाने सारखीच असल्याने बहुतांश नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन फसगत होते.

घरी आणल्यानंतर पश्चात्तापाची वेळ येते. त्याचबरोबर अनावश्यक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपट्याची पाने घेतांना सावधगिरी बाळगून घ्यावीत. फसवणूकीपासून दूर राहावे. आपट्याची पानांसारखी दिसणारे कांचन, अंजन झाडांची दसर्याला जुळ्या भावाची नाहक कत्तल होते. विनाकारण आपट्यासोबत या झाडांची कत्तल थांबावी. यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. वनविभागाने जनजागृती करून मोहीम राबवावी. ही अपेक्षा वृक्षप्रेमींनी व्यक्त केली आहे. आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अबाधित आहे. आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपट्याची पाने गुणकारी आहे.

बहुउपयोगी आपट्या
आपटा ही एक अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती आहे. या झाडाची पाने, शेंगांच्या बिया, फुले, साल औषध म्हणून वापरली जाते. आपट्याच्या सालीपासून दोरखंडही बनवले जातात. तसेच आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. 'अश्मंतक' म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. अशा या आपट्याची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. ही मुळे खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक फुटतात. त्यामुळे खडकाळ, उघड्या टेकड्यांवर हमखास आपट्याच्या झाडाची लागवड केली जाते. तसेच 'अश्मंतक' याचा दुसरा अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा. धन्वंतरीने 'निघण्टू'मध्ये आपट्याच्या झाडाचे आणखी औषधी उपयोग विशद केले आहेत. 


आपट्याचा उपयोग 
लघवीवरील जळजळीवर रामबाण उपाय, जखमेवर गुणकारी, पोटाच्या विकारांवरील औषध, हृदयाची सूज, विंचवाचे विष उतरवण्यासाठी,गालगुंड व कंठरोग म्हणून होतो. अनेक महादोषांच्या निवारणाचे काम करते. शास्त्रीय दृष्ट्या आपट्याचे झाड हे महावृक्ष आहे. एवढे मात्र नक्की.

संपादन- भूषण श्रीखंडे