Loksabha 2019 : धुळे लोकसभा मतदारसंघात अंतिम 28 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

धुळे ः लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आज झालेल्या माघारीअंती उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. चार जणांनी माघार घेतल्याने एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे, 11 उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे तर 14 उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना चिन्हांचे वाटप झाले. 
 

धुळे ः लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात आज झालेल्या माघारीअंती उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. चार जणांनी माघार घेतल्याने एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. यात तीन उमेदवार नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षांचे, 11 उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे तर 14 उमेदवार अपक्ष आहेत. त्यांना चिन्हांचे वाटप झाले. 
 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननी प्रक्रियेत विविध कारणांनी पाच अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे 32 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या प्रक्रियेबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सायंकाळी पाचला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते. 

28 उमेदवार रिंगणात 
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत काल (ता. 11) एक आणि आज शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे उमेदवारी माघारीअंती आता धुळे मतदार संघासाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचेही वाटप करण्यात आल्याचे रेखावार म्हणाले. 

गोटेंना अखेर "फुगा' 
"लोकसंग्राम'तर्फे निवडणूक लढविणाऱ्या श्री. गोटे यांनी शिटी या चिन्हाची मागणी केली होती. मात्र, चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेत त्यांना शिटीऐवजी सफरचंद हे चिन्ह मिळाले होते. त्यामुळे गोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत आपली बाजू मांडली होती. मात्र, नियमाप्रमाणे राबविलेल्या प्रक्रियेत हे चिन्ह अन्य उमेदवाराला गेले. गोटेंनी ज्या दोन चिन्हांचा पर्याय टाकला होता, ते चिन्ह यादीत नव्हते. त्यामुळे त्यांना सफरचंद चिन्ह देण्यात आल्याचे श्री. रेखावार म्हणाले. नंतर गोटे यांनी अन्य चिन्हांची मागणी केली, त्याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्यानंतर रात्री उशिरा आयोगाच्या सूचनेप्रमाणे गोटे यांना फुगा चिन्ह देण्यात आले. 
 
दोन बॅलेट युनिट लागणार 
धुळे मतदार संघासाठी निवडणुकीच्या रिंगणात 28 उमेदवार असल्याने व मतदानासाठी एका बॅलेट युनिटवर 16 उमेदवारांच्या (15 उमेदवार व एक नोटाचे बटन) नाव आणि चिन्हांची व्यवस्था असते. त्यामुळे आता दोन बॅलेट युनिट लावण्यात येतील. त्यासाठी पुरेसे बॅलेट उपलब्ध आहेत असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

यांनी घेतली माघार 
राहुल सुभाष भामरे (अपक्ष), अब्दुल रशीद शेख मेहबूब (अपक्ष), मिर्झा ताहीर बेग समद बेग (अपक्ष), गाझी अहतेझाद अहमद खान (अपक्ष) 

रिंगणातील 28 उमेदवार असे 
संजय यशवंत अपरांती (बसप), कुणाल रोहिदास पाटील (कॉंग्रेस), सुभाष रामराव भामरे (भाजप), अनिल गोटे (लोकसंग्राम), अनिल रामदास जाधव (बळीराजा पार्टी), अन्सारी मोहम्मद इस्माईल मोहम्मद इब्राहिम (भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघ), ताहेर सत्तार खाटीक (राष्ट्रीय मराठा पार्टी), दिलीप भाईदास पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), नबी अहमद अहमदुल्लाह (वंचित बहुजन आघाडी), नंदकुमार जगन्नाथ चव्हाण (राष्ट्रीय जनसेना पार्टी), पंढरीनाथ चैत्राम मोरे (भारतीय ट्रायबल पार्टी), पिंजारी जैनुद्दीन हुसेन (बहुजन महा पार्टी), मेवाती हीना युसुफभाई (भारतीय किसान पार्टी), सीताराम भगा वाघ, इरफान मो. इसहाक (अपक्ष), एकबाल अहमद मोहम्मद रफीक (अपक्ष), कास्मी कमाल हाशीम मोहम्मद आजमी (अपक्ष), चोरडिया धीरज प्रकाशचंद (अपक्ष), तडवी अय्युब खान रज्जाक खान (अपक्ष), दिनेश पूनमचंद कोळी (अपक्ष), दीपक खंडू अमृतकर (अपक्ष), नसीम रऊफ बाबा खान (अपक्ष), नितीन बाबूराव खरे (अपक्ष), पिंजारी सलीम कासम (अपक्ष), सुभाष शंकर भामरे (अपक्ष), मेराज बी हुसेन खान (अपक्ष), मोहम्मद रिजवान मोहम्मद अकबर (अपक्ष), ज्ञानेश्‍वर बळिराम ढेकळे (अपक्ष) 

Web Title: marathi news dhule loksabha 26 candidate