esakal | धुळ्यात ६० कोटींची उलाढाल शक्य 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule market

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याने नागरिकांच्या मनातून भिती जात आहे. त्यामुळे मार्चपासून जूनपर्यंत, नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल होत गेलेल्या लॉकडाउनमुळे शहरासह जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. सद्यःस्थितीत सणासुदीमुळे बाजारपेठ पूर्वपदावर येत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे.

धुळ्यात ६० कोटींची उलाढाल शक्य 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाच्या संसर्गामुळे सहा ते सात महिने जिल्ह्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. सद्यःस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी दिसत असल्याने शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्वपदावर येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेच्या आग्रा रोडवर दोन दिवसांपासून ग्राहकांची मांदियाळी फुलली. यात दिवाळीपूर्वी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रविवारी (ता. २५) शहरासह जिल्ह्यात सरासरी ६० कोटीहून अधिक रकमेची उलाढाल होईल, असे अनुमान व्यापारी महासंघाने वर्तविले. 

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याने नागरिकांच्या मनातून भिती जात आहे. त्यामुळे मार्चपासून जूनपर्यंत, नंतर टप्प्याटप्प्याने शिथिल होत गेलेल्या लॉकडाउनमुळे शहरासह जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. सद्यःस्थितीत सणासुदीमुळे बाजारपेठ पूर्वपदावर येत असल्याचे आशादायक चित्र दिसत आहे. रविवारी दसरा असल्याने सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या पानांची लयलूट होते. तसेच यंदा जास्तीच्या पावसाने उसाचे नुकसान केले. त्यामुळे उसाची किंमत महागलेली असेल. गेल्या वर्षी पंचवीस ते तीस रुपयांना विकला जाणारा ऊस यंदा ४० ते ४५ रुपयांपर्यंत विकला जाईल. बाजारपेठेत ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक, घरगुती साहित्य, सराफे बाजार, कपडे व्यवसायात चांगली उलाढाल होणार असल्याचे चिन्ह आहे. 

ऑटोमोबाईल तेजीत
नागरिकांनी वाहनांची आगाऊ बुकिंग केली आहे. वाडीभोकर रोडवरील पंचायत समितीजवळील एका शोरूममध्ये दसऱ्यानिमित्त सरासरी ८० ते ९० दुचाकीची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. किंबहुना, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्रात चांगली उलाढाल अपेक्षित आहे. नोव्हेंबरपासून कोरोनाची दुसरी फेरी होईल, अशी शक्यता वर्तविली जात असली तरी नागरिकांची या आजाराविषयी भिती गेल्याने बाजारपेठेत रेलचेल वाढल्याचे मानले जाते. त्यामुळे चांगल्या आर्थिक उलाढालीची शक्यताही आहे. 
 
नियमांचे पालन करा ः बंग 
कोरोना नाहीसा झालेला नाही. त्यामुळे सणासुदीचे दिवस, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली जात असली तरी नागरिकांनी शासन, प्रशासनाचे नियम पाळावे. मास्क लावावा, सर्वांनी शारीरिक अंतर पाळावे, हात वारंवार धुवावे, सॅनिटायझेशनचा वापर करावा, असे आवाहन आहे. दुकानदार, व्यापारी, नागरिकांनी काळजी तर घेतली कोरोनाची दुसरी फेरी टळू शकेल, असे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी व्यक्त केले.