धुळे व्यापारी महासंघाला हवी "लॉक डाउन'बाबत शिथिलता...

निखिल सूर्यवंशी
Saturday, 16 May 2020

"कोरोना'चा प्रार्दुभाव न वाढता व्यापार सुरू करण्यासंबंधीचे काही उपाय महासंघाने महापालिकेकडे पत्राव्दारे सादर केले. त्यावर निर्णय झालेला नाही. संवेदनशील क्षेत्रांमध्ये काहीअंशी व्यापार सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनांनी निर्णय घेतल्याचे कळते.

धुळे : शहराच्या सिमारेषांजवळ "कोरोना'चे थैमान असताना प्रशासनाच्या सक्रीयतेमुळे या शहरात मात्र तीव्रता फार कमी आहे. शहरातील सर्व सामान्य जनता आणि व्यापारी वर्गाचेही प्रशासनाला सहकार्य आहे. "कोरोना'मुळे 52 दिवसांपासून देशातील बाजारपेठ बंद आहे. दहा मेपासून काही शहरांमधील व्यावसायिकांना ठराविक दिवशी व वेळेत व्यापार करण्यास स्थानिक प्रशासनाने मुभा दिल्याचे कळते. त्याप्रमाणे धुळे शहरातही परवानगी मिळावी, अशी मागणी धुळे व्यापारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

"कोरोना'चा प्रार्दुभाव न वाढता व्यापार सुरू करण्यासंबंधीचे काही उपाय महासंघाने महापालिकेकडे पत्राव्दारे सादर केले. त्यावर निर्णय झालेला नाही. संवेदनशील क्षेत्रांमध्ये काहीअंशी व्यापार सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनांनी निर्णय घेतल्याचे कळते. त्याप्रमाणे धुळे शहरात निर्णयाची अपेक्षा आहे, असे महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी म्हटले आहे. त्यात ठराविक दिवसांशिवाय व वेळेशिवाय व्यावसायिक प्रतिष्ठान सुरू करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. प्रतीबंधीत क्षेत्राबाबत शासकीय आदेशानुसार सूचनांचे पालन करावे. निकषानुसार सॅनीटाईझर, शारिरीक अंतर, मास्कचा वापर करावा. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी व्यावसायिक, ग्राहक व प्रशासनाची संयुक्तरित्या आहे. त्यामुळे "कोरोना'च्या प्रादुर्भावापासून आपण सर्व दूर राहू शकू, असेही महासंघाने म्हटले आहे. धुळे व्यापारी महासंघाने सुचविलेल्या उपाययोजना अशा ः

- पेठ भाग- सोमवार, बुधवार, शुक्रवार
(गांधी पुतळा ते दुधेडीया हायस्कुल चौक ते भांग्या मारोती चौक ते संत जनागडे चौक ते गांधी पुतळा, जुने धुळे)
- पेठ भाग- मंगळवार, गुरूवार, शनिवार
(भांग्या मारोती चौक ते अन्सारी ट्रान्सपोर्ट ते पोलीस पेट्रोलपंप ते संत जनागडे चौक ते संतोषी माता चौक ते भांग्या मारोती चौक)
- देवपूर भाग- सोमवार, बुधवार, शुकवार
(मोठा पुल ते नेहरू चौक, स्टेडियम परिसरातील पेट्रोल पंप ते साई मंगल कार्यालय ते मोठा पूल)
- देवपूर भाग- मंगळवार, गुरूवार, शनिवार
(नेहरू चौक ते स्टेडियम परिसरातील पेट्रोल पंप, स्टेडीयम ते नगावबारी ते नेहरू चौक)
- साक्री रोड भाग- सोमवार, बुधवार, शुकवार
(डॉ. आशिष पाटील यांच्या दवाखान्यापासून पुढील भाग)
- मालेगाव रोड परिसर- सोमवार, बुधवार, शुकवार
(श्रीराम पेट्रोल पंप ते चाळीसगाव चौफुली, गुरूव्दारा ते श्रीराम पेट्रोल पंप)
ृ- गुरूव्दारा परिसर - मंगळवार, गुरूवार, शनिवार
(गुरूव्दारा ते मोहाडीसह मनपा हद्दीपर्यंत सर्व भाग)
- मिल परिसर- मंगळवार, गुरूवार, शनिवार
(लेनीन चौक ते चितोड परिसर, सर्व जवळील कॉलनी विभाग)
- पारोळारोड परिसर- सोमवार, बुधवार, शुक्रवार
(दुधेडिया हायस्कूल ते बाळापूर शिवार, चाळीसगाव चौफुली ते लोकमान्य हॉस्पीटल, दुधेडिया हायस्कूल)

परीसरातील व्यावसायिकांसाठी नियम 
व्यावसायिक प्रतिष्ठानांची वेळ : सकाळी 9 ते सायं. 5 पर्यंत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule merchant association lockdown Laxity