आमदार निवडून आलाय वेगळा रंग दिला जाऊ नये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

धुळे ः विधानसभेच्या धुळे शहर मतदारसंघात "एमआयएम'चे उमेदवार डॉ. फारुक शाह निवडून आले आहेत. ते लोकनियुक्त आमदार आहेत. या प्रक्रियेत वेगळं अस काहीही घडलेलं नाही. त्यामुळे या निवडीला वेगळा रंग दिला जाऊ नये, अशी अपेक्षा "एमआयएम'चे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सय्यद राफत हुसेन अली यांनी आज प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. 

धुळे ः विधानसभेच्या धुळे शहर मतदारसंघात "एमआयएम'चे उमेदवार डॉ. फारुक शाह निवडून आले आहेत. ते लोकनियुक्त आमदार आहेत. या प्रक्रियेत वेगळं अस काहीही घडलेलं नाही. त्यामुळे या निवडीला वेगळा रंग दिला जाऊ नये, अशी अपेक्षा "एमआयएम'चे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सय्यद राफत हुसेन अली यांनी आज प्रतिक्रिया देताना व्यक्त केली. 

धुळे शहरात तीन हजारांच्या मताधिक्‍याने डॉ. शाह निवडून आले. यासंदर्भात सय्यद राफत हुसेन अली म्हणाले, की जनादेशाचा आदर केला जाईल. डॉ. शाह यांना निवडून आणणाऱ्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. "एमआयएम'ने प्रथमच शहरात विधानसभा निवडणूक लढविली आणि जिंकली. मतदारांनी विश्‍वास दर्शविला. सोशल मीडियावर काही जण या निवडीच्या बाजूने, तर काही जण विरोधात दिसतात. विरोध हा राजकारणाचा भाग असू शकतो. मात्र, या निवडीला वेगळा रंग दिला जाऊ नये. 
गेल्या 70 वर्षांत नेता, आमदार कुठल्या समाजाचा हे न पाहता मतदान केले गेले. संबंधित नेता, आमदाराला जिंकविले. त्यालाच नेता मानले. आताही धुळे शहरात आमदारच निवडून आले आहेत. वेगळे असे काही घडलेले नाही. यात आमदार कुठल्या समाजाचे, जातीपातीचे हे त्या नजरेतून पाहिले जाऊ नये. लोकनियुक्त आमदार म्हणूनच पाहावे. विकासाच्या मुद्यावरच "एमआयएम'ने मते मागितली आहेत. धुळे शहराचा विकास करणे हे पक्षाचे, विजयी उमेदवाराचे ध्येय असेल. तोही सर्व प्रभागात समसमान कसा राहील यादृष्टीने पक्षाचे प्रयत्न असतील. याकामी सर्वांचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा सय्यद राफत हुसेन अली यांनी व्यक्त केली. 
 
"एमआयएम' मुस्लिमधार्जिणा नाही..
"एमआयएम' पक्ष हा केवळ मुस्लिमधार्जिणा नाही. सर्व घटकांतील शोषित, वंचित, सामान्य, तसेच समाजाच्या न्याय हक्कासह प्रगतीसाठी झटणारा हा पक्ष आहे. ते धुळे शहरात या पक्षाला आमदारकी मिळाली असल्याने सिद्ध करून दाखवू, असे सय्यद राफत हुसेन अली सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule MIM vidhan sabha election farukh shah win