esakal | एमआयडीसीतील जागेसह ‘ऑक्सिजन’साठी ८० लाख

बोलून बातमी शोधा

oxygen

एमआयडीसीतील जागेसह ‘ऑक्सिजन’साठी ८० लाख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरासह जिल्ह्यात एकही ऑक्सिजन प्लांट नाही. त्यात शासनाने आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनासंबंधी उपाययोजनांसाठी एक कोटीचा खर्च करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार ऑक्सिजन प्लांटसाठी आमदारांनी योगदान द्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केली. त्यास प्रतिसाद देत शहरातील एमआयएमचे आमदार डॉ. फारूक शाह यांनी स्वतःच्या जागेसह ८० लाखांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे विविध पातळ्यांवरून स्वागत झाले.

हेही वाचा: धुळ्यात सार्वजनिक वापरातील सर्व पूल बंद !

आमदार शाह यांनी शहरात मेडिकल ऑक्सिजन प्लांटसाठी एमआयडीसीतील स्वत:ची जागा मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली असून, तुटवडा जाणवत आहे. यासह शहरातील विविध समस्या पाहता आमदार शाह यांनी एमआयडीसीतील मालकीची दहा हजार चौरसफुटांची जागा (भूखंड क्रमांक डी ४३) दोन वर्षांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा: केळी नुकसानबाबत विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची चाचपणी !

रेमडेसिव्हिरसाठी २० लाख

आमदार शाह यांनी स्थानिक विकास निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी ८० लाखांचा निधीही दिला आहे. तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी २० लाखांचा निधी शासनाला दिला. बांधिलकीतून होणाऱ्या कार्यासंबंधी पत्र त्यांनी शुक्रवारी (ता. २३) जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले. काही दिवसांपूर्वीच आमदार शाह यांनी दोन विद्युतदाहिनी केंद्रांसाठी महापालिकेला ३० लाखांचा निधी दिला.

संपादन- भूषण श्रीखंडे