33 कुळांची कुलदैवत आई पेडकाईदेवी मंदिर भक्तांसाठी खुले

विजयसिंह गिरासे
Monday, 16 November 2020

शासनाने पहिले दारूची दुकाने उघडली व सर्वात शेवटी मंदिरे खुली केली हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे याचा योग्य वेळी आघाडी सरकारला याची किंमत मोजावी लागणार.

चिमठाणे : सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्गावरील चिमठाणे गावाजवळील खानदेशातील 33 कुळांची कुलदैवत असलेल्या आई पेडकाई देवीचे मंदिर तब्बल आठ महिन्यांनी माजी मंत्री तथा शिंदखेडा विधानसभेचे जयकुमार रावल यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या दिवशी भाविकांसाठी खुले करण्यात आली. सकाळी दहा वाजता विधिवत सहकुटूंब व भविकासह पूजन करून मंदिर उघडण्यात आले.

वाचा- जाती प्रमाणपत्राला जादा शुल्क आकारल्यास केंद्रच रद्द 

या वेळी त्यांच्या पत्नी सुभद्राराजे रावल, मुलगी कुमारी बेबीराणी वेदांतश्वरी रावल, कुमार बाबाराजे जयआदित्य रावल, कामराज निकम, पेडकाईदेवी ट्रस्टचे अध्यक्षा आशाबाई भगवानसिंह गिरासे ,सचिव प्रा. भरत काळे, प्रकाश पाटील साहेबराव गोसावी , माजी पंचायत समिती सदस्य निंबा पाटील, साळवे सरपंच पुंडलीक फुलपगारे, उपसरपंच संतोष वाघ, मेथी सरपंच रमाकांत बागले,अलाणे सरपंच मानसिंग गिरासे, समाधान पाटील, लोटन माळी, डॉ शैलेंद्र गिरासे, भगवान बोरसे, पुजारी किशोर गुरव व सुनिल गुरव यांच्या सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारला याची किमत मोजावी लागले

या वेळी आमदार रावल म्हणाले की शासनाने पहिले दारूची दुकाने उघडली व सर्वात शेवटी मंदिरे खुली केली हे महाराष्ट्रातील जनता जाणून आहे याचा योग्य वेळी आघाडी सरकारला याची किंमत मोजावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले तसेच पेडकाई देवी परिसरात नवीन अजून झाडे लावणार असून येथे पाण्याचे तलाव बांधण्याचेही नियोजन असून या परिसरात मोर व हरीण यांचा भविष्यात मुक्त संचार राहणार असून सद्या मोरांची संख्या वाढत आहे त्यांची काळजी परिसरातील नागरिकानी घेण्याचे आव्हानही त्यांनी केले या नंतर त्यांच्या हस्ते सपत्नीक देवीची आरती करण्यात आली नंतर ट्रस्टच्या अध्याक्ष्या आशाबाई गिरासे यांच्या हस्ते आमदार रावल यांच्या पत्नी सुभद्राराजे यांचा सत्कार करण्यात आला तर आमदार रावल यांचा सत्कार ट्रस्टचे सचिव भरत काळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Mother Pedkai Devi temple, the deity of thirty three clans, is open for devotees