esakal | शिवसेनेची टीका;धुळे मनपाची सूत्रे पैसे खाणाऱ्या टोळीच्या हातात
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

शिवसेनेची टीका;धुळे मनपाची सूत्रे पैसे खाणाऱ्या टोळीच्या हातात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : प्रत्येक कामात पैसे खाण्याचे व्यसन जडलेल्या टोळीच्या हातात महापालिकेची (Dhule Municipal Corporation) सूत्रे असल्यामुळे धुळे शहराची पूर्णपणे धुळधाण झाली आहे, अशी जहरी टीका करत शहरातील खड्डयांप्रश्‍नी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन (Movement) करणाऱ्या शिवसेनेने (Shiv Sena) खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या धुळेकरांचा प्रतीकात्मक सजीव देखावा सादर करून आंदोलनाचा दुसरा दिवसही गाजवला.

हेही वाचा: नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच


शहरातील देवपूर भागासह संपूर्ण धुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे रोज छोटे- मोठे अपघात होतात. अपघाताच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्य घराबाहेरही जाऊ देत नाहीत. धुळे शहराची अवस्था एखाद्या बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेल्या शहरासारखी झाली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी व धुळेकरांनी प्रामाणिक भरलेल्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीत भरपूर पैसा येत राहिला. या पैशातून नागरिकांना रस्ते, गटारी, स्वच्छ पाणी व स्वच्छ- सुंदर शहर मिळायला पाहिजे होते. मात्र, प्रत्येक कामात पैसे खाण्याचे व्यसन जडलेल्या टोळीच्या हातात महापालिकेची सूत्रे असल्यामुळे धुळे शहराची पूर्णपणे धुळधाण झाली आहे. शहरातील नागरिकांना केंद्रस्थानी मानून शेकडो कोटीच्या योजनांचा प्रचंड टक्केवारी व फुकटच्या भागीदारीमुळे बट्ट्याबोळ झाला आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.


शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख मनोज मोरे, डॉ. सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, गुलाब माळी, संदीप मुळीक, अमित खंडेलवाल, संगीता जोशी, सुनीता वाघ, शहरप्रमुख अरुणा मोरे, डॉ. जयश्री वानखेडे, ललित माळी, जवाहर पाटील, नितीन शिरसाठ, संजय वाल्हे, बाळू आगलावे, योगेश मराठे, कुणाल कानकाटे, हरीश माळी, प्रवीण साळवे, प्रकाश शिंदे, संजय जगताप आदींनी दुसऱ्या दिवशीही आंदोलनात सहभाग नोंदविला. मनपा प्रशासनाला निवेदन दिले.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका


चायना कंपनीसारखी अवस्था
महापालिका ही ना- नफा, ना- तोटा या तत्त्वावर चालणारी ही संस्था आहे मात्र, या संस्थेची आजची अवस्था एखाद्या चायना कंपनी सारखी झाली आहे. गुणवत्ताशुन्य व कुठलीही गॅरंटी नसलेले प्रॉडक्ट तयार करून भरमसाट नफा कमावणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या चायना कंपनीसारखी महापालिकेची स्थिती आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करणारे ८० टक्के नगरसेवक हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे या नगरसेवकांनी धुळे शहराचे नाव ‘खड्डेपूर’ करण्याचा ठराव येत्या महासभेत घेऊन एकमताने मंजूर करण्यास काहीही अडचण येणार नाही. धुळेकरांची ही एकमेव व अंतिम इच्छा पूर्ण करावी, अशी उपरोधिक टीकाही शिवसेनेने केली.

loading image
go to top