पावसाची उघडीप; धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पूर परिस्थिती ओसरली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

धुळे/नंदुरबार ः दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहिल्याने धुळे, नंदुरबार, नवापूर, शहादा परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास सर्वच नद्या ओव्हरफ्लो होवून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. परंतू रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे पुर परिस्थिती ओसरली आहे. यामुळे जनजीवन पुर्वपदावर येवू लागले आहे. 

धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वच नद्यांना पुर आले होते. गेल्या 36 तासांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने दोन्ही जिल्ह्यांमधील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले होते. शिवाय, घरांमध्ये पाणी शिरत असल्याने नदीच्या काठच्या गावांमधील नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. मात्र, रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी देखील कमी होवून गावांमध्ये आलेले पाणी ओसरू लागले आहे. शहादा शहरात देखील मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली होती. परंतू आज सकाळी हे कमी झाले होते. यामुळे जनजीवन पुर्वपदावर येवू लागले आहे. 

काही बसफेऱ्या सुरू 
धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे बऱ्याठिकाणचे रस्ते खचल्याने वाहतुक बंद होती. यात बहुतांश मार्गावरील बसफेऱ्या आज सकाळपासून सुरू करण्यात आल्या आहेत. परंतू धुळे- नवापूर दरम्याचा रस्ता खचला असल्याने या मार्गावरील वाहतुक अद्याप देखील ठप्प आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nandurbar rain stoped