esakal | धुळे- नंदुरबार विधानपरिषद निवडणूक; भाजपचे अमरीश पटेल विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

amarish patel

सध्या भाजपमध्ये उमेदवारी करत असलेले अमरीश भाई पटेल यांनी काँग्रेसमधून गेल्यावर्षी विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य असताना भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने विधान परिषदेचे सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळेच ही पोट निवडणूक घेण्यात आली.

धुळे- नंदुरबार विधानपरिषद निवडणूक; भाजपचे अमरीश पटेल विजयी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल विजयी झाले. विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 99 टक्के मतदान झाले होते. 

सध्या भाजपमध्ये उमेदवारी करत असलेले अमरीश भाई पटेल यांनी काँग्रेसमधून गेल्यावर्षी विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य असताना भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने विधान परिषदेचे सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळेच ही पोट निवडणूक घेण्यात आली. 

धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

मतदारांनी मला मनापासून मदत केली. आमच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार असल्‍याची प्रतिक्रिया अमरीश पटेल यांनी व्यक्त केली. 

(सविस्‍तर बातमी वाचा थोड्या वेळात)

loading image