धुळे-नरडाणा रेल्वेमार्गासाठी ऑगस्टमध्ये निविदा प्रक्रिया : मंत्री भामरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

धुळे ः बहुप्रतिक्षित मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाअंतर्गत प्रथम धुळे- नरडाणा या तीस किलोमीटर मार्गासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. नंतर सरकारी जागेसह पांझरा नदीवर पाच पुलांचे काम सुरू होईल. या माध्यमातून मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे स्वप्न अवतरणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, की केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या सहकार्याने चाळीस वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे स्वप्न आगामी सहा वर्षांत अवतरेल. धुळे- नरडाणा या रेल्वेसाठी ऑगस्टमध्ये निविदा प्रक्रिया होणार असल्याने तीन वर्षांच्या पाठपुराव्यातून आणि लोकसभेच्या धुळे मतदारसंघाने टाकलेल्या विश्‍वासातून हे यश साध्य होत आहे. 
धुळे- नरडाणा रेल्वेचे काम झाल्यावर चाळीसगाव स्थानक अहमदाबाद रेल्वेस जोडले जाईल. अहमदाबाद- अमरावती- सुरत रेल्वेचे नरडाणा येथे जंक्‍शन तयार होऊ शकेल. चाळीसगाव- जळगाव रेल्वेमार्गास पर्याय उपलब्ध होईल. गुजरात व दक्षिण भारताच्या प्रवासी व मालवाहतुकीस सरासरी दोनशे किलोमीटरचे अंतर कमी होऊन इंधन व वेळेची बचत होईल. नरडाणा व धुळे औद्योगिक वसाहत तसेच 2019 च्या टप्प्यातील जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाला यामुळे चालना मिळून जिल्हा विकासाला गती मिळेल.

Web Title: marathi news dhule nardana railway line bhamre