esakal | महामार्गावरील पुल खचतो तेव्हा…
sakal

बोलून बातमी शोधा

dhule natinal highway

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फसलेला ट्रक व पूलाची धोकेदायक स्थितीत ट्रकचालक अडकले आहेत. रस्त्यात फसलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते.

महामार्गावरील पुल खचतो तेव्हा…

sakal_logo
By
तुषार देवरे

कुसुंबा (ता.धुळे) : गावाजवळील नाल्याला पावसामुळे पाणी वाढले आहे. वाढत्या पाण्यामुळे जवळून गेलेल्‍या महामार्ग खचण्यास सुरवात होते. यात अवजड वाहनांची वाहतूक म्‍हणजे धोकेदायकच ठरत आहे. या दरम्‍यान रात्री साडेदहाच्या सुमारास केरळकडून गुजरात राज्यात जाणारा कंटेनर फसल्‍याने वाहतुक थांबली आहे. शिवाय दुसऱ्या बाजुने पूल खचला असल्‍याच्या परिस्थितीमुळे शेकडो ट्रक रात्रीपासून महामार्गावर थांबले आहेत. दुतर्फा तीन- चार किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फसलेला ट्रक व पूलाची धोकेदायक स्थितीत ट्रकचालक अडकले आहेत. रस्त्यात फसलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान महामार्गावर गोंधळ होऊ नये; म्हणून काही वाहनांना कुसुंबापासून कावठी, मेहेरगाव गाव मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. पूल लगत पाणी थेट पांझरा नदीत वाहत आहे. अन्यथा पूल वाहण्याची शक्यता होती.

नवीन पुलाचे काम खोळंबले
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. नदीवरील पूलालगत नवीन पूलाचे सुरू असलेले काम खोळंबले आहे. काम बंद असल्याने अवजड वाहनांची वर्दळ, भार तात्पुरत्या पूलावर आहे. त्यामुळे या पूलाची धोकेदायक स्थिती निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. 

तर वाहने उलटण्याची शक्‍यता
महामार्गावरून गुजरात राज्यात दररोज शेकडो वाहने ये- जा करतात. गेतवर्षीही समस्या उद्‌भवली होती. मात्र महामार्ग प्राधिकरण विभाग फक्त तात्पुरती मलमपट्टी करते. नंतर मात्र 'जैसे थे स्थिती' होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गावरील खड्डे बुजवून किरकोळ दुरूस्ती कराव्यात. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धोकेदायक महामार्गामुळे वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. महामार्ग प्राधिकरण विभागाने गांभीर्याने विचार करीत प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. मात्र याबाबत कुठलेही सोयर सुतक नाही. अशा घटनेवेळी महामार्ग पोलिसांनी तात्काळ येऊन वाहतूक सुरळीत करणे अपेक्षित आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image