शेतकरी धर्मा पाटलांवर विखरणमध्ये अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

दोंडाईचा- विखरण परिसरात (ता. शिंदखेडा, जि. धुळे) प्रस्तावित औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांची चार एकर शेती बाधित झाली. त्यांना चार लाखांचा मोबदला मिळाला. मात्र, लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र 74 आर. असताना त्याला एक कोटी 89 लाखांचा मोबदला दिला गेला.

दोंडाईचा : "सरकारी अनास्थेचा बळी' अशा निषेधाचा एक बॅनर झळकावत विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील ग्रामस्थांनी प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी धर्मा मंगा पाटील (वय 80) यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर विखरणच्या अमरधाममध्ये आज (मंगळवारी) सकाळी साडेदहानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. 

दोंडाईचा- विखरण परिसरात (ता. शिंदखेडा, जि. धुळे) प्रस्तावित औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांची चार एकर शेती बाधित झाली. त्यांना चार लाखांचा मोबदला मिळाला. मात्र, लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र 74 आर. असताना त्याला एक कोटी 89 लाखांचा मोबदला दिला गेला. सरकारी यंत्रणेने असा दुजाभाव का केला? मला अत्यल्प लाभ देण्याचे कारण काय? शेतात सहाशे आंब्यांची झाडे असताना मूल्यांकनात का दर्शविण्यात आली नाहीत, असे काही गंभीर प्रश्‍न उपस्थित करत पाटील पिता- पुत्र तीन वर्षांपासून शासन, प्रशासनाशी भांडत होते.

न्याय मिळत नसल्याने शेतकरी धर्मा पाटील यांनी 23 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. मृत्यूशी झुंज देत असताना त्यांचा रविवारी (ता. 28) रात्री साडेनऊला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे धाबे दणाणलेल्या युती सरकारने तीस दिवसांत नियमानुसार पीडित पाटील कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. धर्मा पाटील यांचे पार्थिव सोमवारी (ता. 29) रात्री अकराला विखरण येथे आणण्यात आले. 

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 
विखरण गावात आज काळी साडेदहानंतर शोकाकुल वातावरणात शेतकरी धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी गर्दी उसळली होती. मुलगा नरेंद्र यांनी अग्निडाग दिला. रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, ज्ञानेश्‍वर भामरे, दोंडाईचाचे माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, कामराज निकम, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, राजेंद्र देसले, हितेंद्र महाले यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
आठ महिन्यांची मुलगी सोसतेय बलात्काराची यातना
पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन
शुभमान गिलने मोडले अनेक विक्रम; वडीलांकडून कौतुक
भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश
धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली: शिवसेना​
ध्येय, कष्ट, जिद्दीच्या ओंजळीत 'पद्म'वृष्टी​
ध्येयपूर्तीसाठी स्मार्ट वर्क...!​
सरकारी अनास्थेमुळे मातेवर आत्महत्या करण्याची वेळ​
महात्मा गांधींना हवं होतं अहिंसक विज्ञान​
स्मरण एका इतिहासाचे​
झीनत अमान यांची बिझनेसमनविरोधात विनयभंगाची तक्रार

Web Title: Marathi news Dhule news Dharma Patil cremation