कमी पाण्यातील फळबागांचे विभागीय आयुक्तांकडून कौतुक

dhule
dhule

म्हसदी (धुळे) : बेहेड(ता.साक्री)शिवारात कमी पाण्यात ठिबक सिचंनावर फळ पीक, भाजीपाला शेतीसह कृषी विभागाच्या शेततळे, कांदाचाळ यासारख्या योजना यशस्वीपणे राबविल्याचे पाहून शुक्रवारी विभागीय आयुक्त महेश झगडे थक्क झाले. कमी पाण्यात शासनाच्या विविध योजनांचा योग्य उपयोग केला तर हमखास यश येईल असा विश्वास विभागीय आयुक झगडे यांनी व्यक्त केला. परिसरातील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला.

जाणून घेतले शेतीचे तंत्रज्ञान .......!
अलीकडे प्रत्येक शेतकरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने तंत्रशुद्ध पध्दतीने शेती करू लागला आहे. बेहेड शिवारात उदयान पंडित संजय निंबा भामरे,विजय निंबा भामरे व तरुण शेतकरी राजेंद्र निंबा भामरे या तीन भावंडांनी एकाच ठिकाणी 72 एकर क्षेत्रात फळ पिकातील डांळिब, द्राक्षे, पेरू, सीताफळ व भाजीपाल्यातील शेवगासह अन्य पिके ठिबक सिचंनने फुलविले आहेत. शुक्रवारी सायंकाळी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी भेट देत पाहणी केली. तहसिलदार संदिप भोसले, तालुका कृषी अधिकारी सी.के. ठाकरे, कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, कृषी पर्यवेक्षक चेतन सोनवणे, एस. आर. तोरवणे, कृषी सहाय्यक किरण देवरे, अविनाश कुवर, बेहेडचे सरपंच प्रतिनीधी छोटूराम तोरवणे, संदिप भामरे, नरेश भामरेसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजनांची पाहणी
बेहेड शिवारात डांळिब, शेवगा, द्राक्ष, सीताफळाची बाग, सामहिक शेततळे, पॅकींग शेडची पाहणी केली. तहसीलदार श्री.भोसले यांनी जलयुक्त शिवार अभिमानाची माहिती दिली. बेहेड येथील जलयुक्त शिवार अभिमानाच्या कामांची पाहणी केली.कृषी विभागाच्या योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी सी.के.ठाकरे,कृषी सहाय्यक किरण देवरे,अविनाश कुवर यांनी दिली.

शासन व कृषी विभागाच्या सामूहिक शेततळे, ठिबक सिंचन,पॅकीग हाऊस,नॅशनल हार्टीकरची फळ शेती, आधुनिक शेती अवजारे, कृषी अवजारे व सेंद्रीय शेतीची माहिती जाणून घेतली. सेंद्रिय शेवगा, डांळिब, द्राक्षे व भाजीपाला पिकाच्या उत्पादनाविषयी समाधान व्यक्त केले. बेहेड शिवारात श्री.भामरे यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात पाच हजार घन मीटर सामूहिक शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेत पॅकींग हाऊस, रोजगार हमी योजनेत डाळिंब लागवड केली आहे. जलयुक्त शिवार अभियानात काळगाव येथे झालेल्या कामांचा झगडे यांनी आढावा घेतला. सरपंच प्रतिनीधी विजय भामरे यांनी विविध कामांची माहिती दिली.काळगाव येथे जलयुक्तमध्ये दोन कोटीच्या कामातून पाणी अडविल्याची माहिती ग्रामंस्थ व उद्यान पंडित संजय भामरे यांनी दिली.श्री.झगडे यांनी जलयुक्त शिवार अभियानात गुणवत्ता पूर्वक कांमासाठी कृषी व महसूल विभागाने वेग द्यावा अशा सूचना तहसीलदार व कृषी अधिका-यांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com