भडगाव तालुक्यातील 22 गावे हागणदारी मुक्त 

सुधाकर पाटील
गुरुवार, 15 मार्च 2018

तालुक्यातील 22 गावे ही हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. उर्वरित गावेही 31 मार्च हागणदारी मुक्त होतील. त्यामुळे संपुर्ण तालुकाच ओडीएफ होईल. ग्रामस्थांनी बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करावा 
- दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी  भडगाव

भडगाव : भडगाव तालुकाही शंभर टक्के हागणदारी मुक्ततेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आतापर्यंत 22 गावे हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. तर उर्वरित 27 गावेही 31 मार्च पर्यंत हागणदारीमुक्त होतील असे पंचायत समिती प्रशासनाकडुन सांगण्यात आले. तर यापुर्विच भडगाव शहर हागणदारी मुक्त झाले आहे.

भडगाव तालुक्यात एकुण 49 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी तब्बल 22 गावांची त्रयस्थ समितीने पाहणी करून हागणदारी मुक्त म्हणून घोषित केले आहे. तर उर्वरित 27 ग्रामपंचायतीही मार्च अखेर पर्यंत संपुर्ण हागणदारी मुक्त होण्याची चिन्हे आहेत. गेल्या पाच वर्षात तालुक्यात 15 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहेत. त्यामुळे तालुका स्वच्छतेकडे वाटचाल करतांना दिसत आहे. 

5 वर्षात 15147 शौचालय बांधले 
भडगाव तालुक्यात  2012 मधे झालेल्या सर्वेक्षणात 15 हजार 501 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे निर्दशनास आले होते. त्यानुसार स्वच्छ भारत  अभियान व रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात तब्बल 15 हजार 147 कुटुंबाकडे शौचालय बांधण्यात आले. 2017-18 यावर्षात  तब्बल 9 हजार 507 वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहेत. 354 कुटुंब हे स्थलांतरीत असल्याने त्यांच्याकडे  शौचालय बांधता आले नाही.

22 गावे झाले हाघणदारी मुक्त!
आतापर्यंत तालुक्यातील 22 ग्रामपंचायती या शंभर टक्के हाघणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. त्यात आडळसे, भोरटेक बु., शिवणी, बाळद, बांबरूड प्र.ब., भट्टगाव, मांडकी, वरखेड, वाक, तांदुळवाडि, सावदे, पासर्डी, पाढंरद, लोण प्र.ऊ. , लोणपिराचे, मळगाव, गोंडगाव, घुसर्डी, बोरनार, अंजनविहीरे, अंतुर्लि, बोदर्डे या गावांचा समावेश आहे.  या गावांची त्रयस्थ समितीने तपासणी केल्यानंतर ही गावे हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले. अद्याप 27 गावे ही तपासणीचे बाकी आहे. 

शौचालयासाठी 12 हजार अनुदान 
शौचालय बांधण्यासाठि  भारत  स्वच्छ अभियानांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 12 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. तर काही शौचालय ही रोजगार हमी योजना अंतर्गत ही बांधण्यात आले आहेत. तालुक्यातील शौचालयाचे अनुदानापोटी  शासनाकडे पंचायत समिती कडुन  तिन कोटीची मागणी करण्यात आली आहे.

आता वापराबाबत जनजागृती व्हावी
तालुक्यात आतापर्यंत 22 गावे शंभर टक्के हाघणदारी मुक्त झाले आहेत. उर्वरित गावे ही मार्च अखेरपर्यंत हागणदारी मुक्त होणार आहे. त्यामुळे आता या शौचालयाचा  वापराबाबत जनजागृती करावी लागणार आहे. अंगणवाडी, जि.प. शाळा मधे  शौचालय आहेत पण त्यांचा वापर होतांना दिसत नाही. अर्थात शौचालयासाठी आवश्यक असलेले अतिरीक्त  पाणीही लोकांना उपलब्ध मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.  

वर्षनिहाय बांधण्यात आलेले स्वच्छतागृह 
वर्ष...............बांधण्यात आलेले शौचालय    
2013-14.........129
2014-15.........795
2015-16.........1649
2016-17.........3067
2017-18.........9507

तालुक्यातील 22 गावे ही हागणदारी मुक्त म्हणून घोषित झाले आहेत. उर्वरित गावेही 31 मार्च हागणदारी मुक्त होतील. त्यामुळे संपुर्ण तालुकाच ओडीएफ होईल. ग्रामस्थांनी बांधलेल्या शौचालयाचा नियमित वापर करावा 
- दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी  भडगाव

Web Title: Marathi news Dhule news toilet free