मुलीला वाचविणाऱया डॉक्टरला वडिलांनी दहा लाखाचे बक्षिस दिले, पण त्यांनी ते नाकारले 

भूषण श्रीखंडे
Tuesday, 11 August 2020

या तरुणीला मायेचा आधार मिळून तिला आत्मविश्‍वाय निर्माण झाला. दुसरीकडे कुटूंबाचा ही क्वारंटाईनचा कालवधी संपल्याने वडीलांना आपली मुलगी कोरोनाच्या महासंकटातून सुखरूप बाहेर पडली हे ऐकून वडिलांना अश्रू अनावर झाले.

धुळे : कोरोना बाधितांना मदतीचा हात देण्यास जवळचे सुध्दा टाळाटाळ करतात. त्यात अनोळखी व्यक्तीकडून या कोरोनाच्या संकटात त्याचा मदतीचा हात मिळणे हे खुप महत्वाचे असते. एखादा व्यक्तीला कोरोनाची लागण झालेल्या त्याच्या कुटूंबाला देखील हायरिस्कमध्ये संपर्क म्हणून विलगीकरण करून त्यांचे स्वॅब घेवून कॉरटाईंन केले जाते. अशीच घटना धुळ्यात एका मुलीला कोरोना झाला काळजी घेणारे कुटूंबातील सर्व सदस्य क्वॉरटाईंन झाल्याने मदत कोणाला कशी मागावी हे तिला कळेना. तिकडे बापाला देखील मुलीची चिंतेने बांधा फुटला.

धुळ्यात एका परिसत राहणाऱया एकोनावीस वर्षांच्या तरुणी कोरोना बाधित झाली. मुलीला कोरोना झाल्याचे समजताच कुटूंबातील इतर सदस्यांसोबत बापाच्या काळजाचा ठोकाच चुकला. उपचारासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या तरुणीला कोविड सेंटरमध्ये नेले आणि इकडे कुटुंबातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन केलं. त्यामुळे मुलीचा काळजी कोण घेईल, उपचार कसे होतील या काळजी व विचाराने बापाचा बांधाच फुटला. 

अन तिला मिळाला धिर 
घरच्यांपासून कधीच दुर ही तरुणी राहली नाही त्यात आता घरातील सर्व सदस्य क्वारंटाईन आपली काळजी कोणार घेणार या विचारांनी तरुणी अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता कोविड सेंटरमधील आरोग्य निरीक्षक सुनील पुंड यांनी पाहिली. आणि पुंड यांनी तरुणीला धीर देत तु माझ्या मुलीसारखी आहे काळजी करू नकोस असा धिर दिली. 

घरून जेवणाचा डबा डॉक्टरांनी आणला
कोविड सेंटरमध्ये या तरुणीवर उपचार सुरू असतांना सुनील पुंड यांनी या तरुणीची वडिलांप्रमाणे काळजी घेतली. घरातून जेवणाचा येणारा गरम डबा देण्यापासून ते तिला काय हवे याची काळजी पुंड यांनी आपले काम सांभाळून केली. त्यामुळे या तरुणीला मायेचा आधार मिळून तिला आत्मविश्‍वाय निर्माण झाला. दुसरीकडे कुटूंबाचा ही क्वारंटाईनचा कालवधी संपल्याने वडीलांना आपली मुलगी कोरोनाच्या महासंकटातून सुखरूप बाहेर पडली हे ऐकून वडिलांना अश्रू अनावर झाले.

वडीलांनी दिला दहा लाखाचा धनादेश
कठीण काळात मुलीला काळजी घेणारे कोणी नसतांना तरुणीच्या डॉक्टरांनी घेतलेली काळजी मुळे तरुणीच्या वडिलांनी डॉक्टर तुम्हीच देव असल्याचे सांगितले. माझ्या मुलीला वाचवल त्या मायेची ही परतफेड म्हणत 10 लाख रुपयांचा धनादेश डॉक्टरांना दिला. आणि तुम्हाला हवे तेवढे घ्या अस म्हणत डोळ्यात अश्रू येत त्यांनी डॉक्टरसमोर हात जोडले.

माझ्या मुलीसारखी म्हणत नाकारला धनादेश
सुनील पुंड यांनी मात्र या तरुणीच्या वडलींची समजूत काढत मला पैसे नकोत हे माझ हे कर्तव्य होते. मी हिची माझ्या मुलीसारखी काळजी घेतली यातच मला समाधान आहे. बक्षिसापेक्षा शासकीय सेवेतून या मुलीला संकटातून बरे काढू शकलो हे मिळालेले समाधान खूप मोठ आहे असे डॉ. सुनील पुंड यांनी मुलीच्या वडीलांना सांगितले. तसेच एका दैनिकाला देखील याबाबत माहिती दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nineteen year old girl corona interrupted save life doctor