esakal | धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असल्याचा इशारा देत शासन-प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे  ः कोरोना विषाणू संसर्गाने बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात कमी झाल्याचे किंबहुना निचांकी आकड्यावर आलेला असताना आज (ता.१७) बाधितांचा आकडा पुन्हा वर गेला. दिवसभरात २७ बाधित समोर आले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आजअखेर १३ हजार ७३५ झाली. 

वाचा- सर्व शिक्षकांची कोविड चाचणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाचीच ! -


जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाने बाधित व कोरोनामुळे मृत्यूचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी झाला आहे. त्यातही विशेषतः बळींची संख्या स्थिरावली आहे. त्यामुळे दिलासा आहे. बाधितांचा आकडाही एकअंकीपर्यंत खाली आला. काल (ता.१६) बाधितांच्या आकड्याने निचांकी गाठली होती अर्थात केवळ तीन बाधित समोर आले होते. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असल्याचा इशारा देत शासन-प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच प्रत्यय आज दिसून आला. आज बाधितांचा आकडा पुन्हा २७ पर्यंत गेला. कोरोनामुळे मात्र आजही कुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले नाही.

कोरोनाबाधित असे

मंगळवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (६४ पैकी ०४), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (१२६ पैकी १०), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (२५ पैकी ०२), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ०२ पैकी ००), महापालिका पॉलिटेक्निक कोविड केअर सेंटर (१७७ पैकी ०३), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (११ पैकी ०१), खाजगी लॅब (२३ पैकी ०७). 

संपादन- भूषण श्रीखंडे