किडनी चोरांच्या संशयावरून जमावाच्या हल्ल्यात तीन ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

आमळी (ता. साक्री, जि. धुळे)ः किडनी चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी पकडलेल्या चार जणांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच यातील तीन जणांचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला केला असून, धुळ्याहून जादा बंदोबस्त पाठविण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी अकराच्या सुमारास दहिवेलपासून (ता. साक्री) तीस किलोमीटरवरील गुजरात राज्याच्या सीमेजवळ घडली आहे. 

आमळीपासून जवळच असलेल्या राईनपाडा, हनुमंतपाडा आणि काकरपाडा या गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. काकरपाडा येथे आज सकाळी इंडिका कारमधून आलेल्या पाच ते सहा जणांनी काकरपाडा व राईनपाडा येथील पाच ते सात वर्षांच्या दोन मुलांना काही तरी विचारण्याचा बहाणा करीत जवळ बोलविले. ग्रामस्थ हे पाहत होते. मात्र, जेव्हा ते दोन्ही मुलांना कारमध्ये घालून नेऊ लागले तेव्हा मात्र ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी ताबडतोब कार अडवून कारमधील संशयितांना बाहेर येण्यास सांगितले. तोपर्यंत जमलेल्या गर्दीने हे मुलांना पळविणारे आहेत हे सांगायला सुरवात केल्याने संपूर्ण गाव जमला. ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून कारचालकाने मात्र पळ काढला. 
ग्रामस्थांनी पाचही जणांना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मारहाण करीतच आणले. जमावानेही मिळेल त्या साधनांनी पाचही जणांना बेदम मारहाण केली. त्यातच तिघांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह ग्रामपंचायतीजवळच ठेवले आहेत. अन्य दोघे जखमी असून, ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. घटनेची तीव्रता पाहून साक्रीहून जादा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. गावातील परिस्थिती तणावपूर्ण आहे. 
 
ते नेमके कुठले? 
मुलांना पळविणाऱ्यांची टोळी आली असून ते किडनी चोर असल्याची चर्चा कालपासून साक्री तालुक्‍यात सुरू आहे. त्यानंतर आज तशीच घटना घडल्याने व ग्रामस्थांनी स्वतः त्या मुलांना पळवून नेताना पाहिल्याने त्यांचा संताप अनावर झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. मात्र, ते चोर नेमके कुठले आहेत, याचा अजून ठावठिकाणा समजलेला नाही.

Web Title: marathi news dhule pablic attack 3 daith