सायकलिंगचा छंद मुलीसह पाच देशांत प्रवास

सायकलिंगचा छंद मुलीसह पाच देशांत प्रवास

कापडणे : अलीकडे आबालवृद्धांमध्ये सायकलिंगचे वेड दिसून येते. पहाटे सायकलिंग करत व्यायामावर अनेक जण भर देत आहेत. यासाठी खास पद्धतीच्या सायकलही घेतल्या जात आहेत. रोहाणे (ता. शिंदखेडा) येथील पाटील कुटुंबीयही सायकलिंगच्या प्रेमात पडले असून, पती- पत्नीसह त्यांच्या कन्येने पाच देशांत सायकलने प्रवास केला आहे. मोठी कन्या सईने कन्याकुमारी ते काश्‍मीर असा सुमारे साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्येही स्थान मिळवत कुटुंबासह गावाचा नावलौकिक उंचावला. 

नक्‍की पहा > ब्रेल लिपीतून प्रज्ञाचक्षूंना "साहित्य'दृष्टी
रोहाणे येथील डॉ. सतीलाल पाटील, त्यांच्या अर्धांगिनी जागृती पाटील आणि मुलगी सई यांना सायकलिंगच्या वेडाने झपाटले आहे. या वेडाचे रूपांतर छंदात केव्हा झाले, हे त्यांनाही कळले नाही. पाटील कुटुंब पुणे येथील हिंजवडीमध्ये स्थायिक आहे. त्यांनी नुकतेच रोहाणे आणि धनूर येथे भेट देत 20 आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करत सायकल चालवा- स्वस्थ राहा अन्‌ नवनवे विक्रम प्रस्थापित करा, असा संदेशही दिला. 

नाशिक ते स्टॅच्यू ऑफ युनिटी 
पाटील कुटुंबाने चार दिवसांपूर्वी नाशिक ते स्टॅच्यू ऑफ युनिटी असा सायकल प्रवास अवघ्या दीड दिवसात पूर्ण केला. प्रवासात ठिकठिकाणी थांबून "बेटी बचाव बेटी पढाव', "सायकल चालवा पर्यावरण वाचवा'चा संदेशही दिला. 

"इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद 
डॉ. पाटील कुटुंबाने पत्नी आणि दोन्ही मुलींसह सायकलने पाच देशांचा प्रवास केला आहे. त्यांची कन्या सईने नववीत असतानाच 2018 मध्ये काश्‍मीर ते कन्याकुमारी हा तीन हजार चारशे किलोमीटरचा प्रवास 29 दिवसांत पूर्ण केला. तिच्या या प्रवासाची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. दरम्यान, पाटील कुटुंबाचा धनूर (ता. धुळे) येथे राज्य आदर्श शिक्षक सतीश शिंदे यांच्या हस्ते नुकताच सत्कार झाला. योगेश भामरे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त किशोर पाटील, विश्वनाथ सोमवंशी, शांतूभाई पटेल, निवृत्त अभियंता सुरेश पाटील, शारदा शिंदे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com