esakal | पिंपळनेरला व्‍यापाऱ्यांनी पुकारला कांदा लिलाव बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

pimpalner bajar samiti onion

कांद्याचा लिलाव सुरळीत पार पडला. गेल्या सात ते आठ दिवसांपासून बाजार समितीत बेमुदत बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजार समिती व व्यापारी यांच्यात शेतकऱ्यांना सेम डेटचे पेमेंट करणे, लायसन्स व इतर डाकुमेंट घेण्यावरून मतभेद असल्याने बाजार समिती बंद होती.

पिंपळनेरला व्‍यापाऱ्यांनी पुकारला कांदा लिलाव बंद 

sakal_logo
By
भरत बागूल

पिंपळनेर (धुळे) : केंद्र शासनाने कांदा साठेबाजीवर मर्यादा व निर्बंध घातल्याने आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बेमुदत बंद पुकारला आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवस लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू होती. व्यापाऱ्यांनी कांद्याला सहा हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव देऊन कांदा खरेदी केला, तर सरासरी कांदा हा ४००० ते ५००० असा भाव प्रतिक्किटल होता. 

येथील उपबाजार समितीत मंगळवारी (ता. २७) कांद्याचा लिलाव सुरळीत पार पडला. गेल्या सात ते आठ दिवसांपासून बाजार समितीत बेमुदत बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. बाजार समिती व व्यापारी यांच्यात शेतकऱ्यांना सेम डेटचे पेमेंट करणे, लायसन्स व इतर डाकुमेंट घेण्यावरून मतभेद असल्याने बाजार समिती बंद होती. पण समितीचे सभापती यांच्या आदेशाने सोमवारी (ता. २६) बाजार समितीत लिलाव प्रक्रिया झाली. यावेळी कांदा लिलाव ठिकाणी व्यापारी देखील हजर होते. 

लिलावास प्रतिनिधीच नाही
कांद्याला सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला, तर सरासरी चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव होता. नव्या कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव व्यापाऱ्यांनी दिला. बाजार समितीने स्वतःच्याच प्रांगणात कांदा लिलाव प्रक्रिया केली. यावेळी सचिव देखील उपस्थित होते. या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी संचलित बाजार समितीचे एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. तसेच बाजार समितीत शांततेत लिलाव प्रक्रिया पाहण्यास मिळाली. 

म्‍हणून बेमुदत बंद
लिलावानंतर उपबाजार समितीत व्यापाऱ्यांची भेट घेवून त्यांना सचिव अशोक मोरे यांनी सेम डेट चेक पेमेंट तसेच कागदपत्रे जमा करण्याची सूचना केली. तरी आज बाजार समितीत एक शेतकरी येऊन सचिव व शाखा प्रमुख यांना भेटून संबंधित व्यापाऱ्याने सेम डेट चेक पेमेंट केले नाही अशी तक्रारी होत्या. पुन्हा व्यापाऱ्यांनी शासनाने साठेबाजीवर मर्यादा व त्यावर निर्बंध घातले असून त्याविरोधात बेमुदत बंद पुकारला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे