esakal | पायपीट करीत जिल्हाधिकाऱ्यांनी गाठले कजाळा गाव
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Manisha Khatri

पायपीट करीत जिल्हाधिकाऱ्यांनी गाठले कजाळा गाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धडगाव: ग्रुप ग्रामपंचायत डेब्रामाळ अंतर्गत कंजाला या गावाला गुरुवारी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी गावाला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध विकास कामाची पाहणी करण्यात केलीली. विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकारी (Collector) यांनी एक किमी पायी डोंगरावर चढुन बांबु आणि लाकूड यांच्या पासुन स्ट्रक्चर उभारून पाण्याची टाकी बांधलेल्या मिनी पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन केले.

हेही वाचा: नवापूरः व्यायाम करतांना आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

यावळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नळ जोडणी केलेल्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून कामाबद्दल खुप कौतुक केले. तसेच या कामाचे हे मॉडेल निश्चित उपयुक्त ठरेल असे म्हणाले. तसेच VSTF अंतर्गत तयार करण्यात आलेले वनधनला देखील भेट देऊन बगर मिल आणि इतर यंत्राची ही पाहणी केली. अति दुर्गम भागात असे नाविन्यपूर्ण उपक्रम उभे करून एक आदर्श काम करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले.

हेही वाचा: जळगाव ग. स. सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

रान भाज्यांचा घेतला आस्वाद

सातपुड्याच्या सान्निध्यात प्रत्येक हंगामात विविध प्रकारचे जवळपास 75 ते 80 रानभाज्या हे उपलब्ध असतात परंतु त्यांचे संगोपन आता होतं नाही त्यासाठी आवश्यक रानभाज्या महोत्सव (यात्रा) म्हणून प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. त्या परिसरातील विविध गावाचे रानभाज्या प्रेमी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून प्रत्यक्ष रानभाज्याची चव घेतली. यावेळी तहसीलदार राठोड, गटविकास अधिकारी सुर्यवंशी, विस्तार अधिकारी बिऱ्हाडे, उपअभियंता पाणीपुरवठा विभागाचे तुषार वाघ, माजी सभापती रुषा वळवी सरपंच भिमसिंग वळवी रामसिंग दादा वळवी विविध संस्थेचे पदाधिकारी गावातील नागरिक उपस्थित होते.

loading image
go to top