esakal | धुळ्यात २५ तलवारी, चॉपर जप्त; मालेगाव कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात २५ तलवारी, चॉपर जप्त; मालेगाव कनेक्शन

कपडा बाजार परिसरात दोन संशयित काळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन उभे असल्याचे दिसले.

धुळ्यात २५ तलवारी, चॉपर जप्त; मालेगाव कनेक्शन

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

 
धुळे : येथील चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरातील सार्वजनिक हॉस्पिटलजवळ दोन संशयितांच्या ताब्यातून २५ तलवारीसह एक चॉपर जप्त केला. त्यांनी विक्री केलेल्या सहा तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या. मालेगाव कनेक्शनमधील एकूण मुद्देमाल ३८ हजार रुपयांचा आहे. 

वाचा- ७६ वर्षीय आजीबाईंना पाहून सारेच होताय थक्‍क; ओपन जीमवर नियमित व्यायाम

सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने सार्वजनिक हॉस्पिटलजवळ कारवाई केली. तेथे कपडा बाजार परिसरात दोन संशयित काळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन उभे असल्याचे दिसले. त्यांच्यावर संशय बळावल्याने रविवारी सायंकाळी साडेसहाच्या झडतीत संशयितांकडे म्यानमध्ये ठेवलेल्या १९ मोठ्या तलवारी आणि एक चॉपर मिळला. या प्रकरणी पोलिसांनी शाकिब हुसेन जाकीर हुसेन अन्सारी (रा. शादाबनगर, मायक्रो टॉवर, धुळे) आणि अरबाज शमीम शेख (रा. वडजाई रोड, मारुती मंदिरामागे, धुळे) यांना ताब्यात घेत अटक केली.

विक्रीसाठी आणल्या होत्या तलवारी
तपासात येथील संशयितांनी मालेगाव येथील मुजाहीद व त्याचा साथीदार यस्सा यांच्याकडून एकूण २५ तलवारी व चॉपर विक्रीसाठी आणला. पैकी सहा तलवारी त्यांनी विक्री केल्याचे सांगितले. शोधानंतर दोन तलवारी मोहंमद शादाब मुख्तार अहेमद अन्सारी, एक तलावर तौसिफ अब्बास पिंजारी, एक तलवार शन्सारी अमीर जलील अहेमद, दोन तलवार जियाउर रहेमान इम्रान अहेमद यांनी खरेदी केल्या. या संशयितांकडून सहा तलवारी जप्त झाल्या. त्यानुसार एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल, त्यात २३ मोठ्या आणि दोन लहान तलवारी आणि एक चॉपर मिळून आला. या प्रकरणी एकूण आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विलास ठाकरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार प्रेमराज पाटील, अजीज शेख, भुरा पाटील, सुशील शेंडे आदींनी केली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image