esakal | गोंडस बाळाला जन्म दिल्‍यानंतर महिलेचा मृत्‍यू; नातलगांचा डॉक्‍टरांवर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

woman dies after giving birth

बाळंतपणासाठी दोन महिन्यांपूर्वी माहेरी आलेली होती. बाळंतपणाच्या अनुषंगाने ती येथील शहरातील एका हॉस्पिटलमधील औषधोपचार घेत होती. दरम्यान ७ नोव्हेंबरला सकाळी तिला प्रसूतीसाठी संबंधित खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

गोंडस बाळाला जन्म दिल्‍यानंतर महिलेचा मृत्‍यू; नातलगांचा डॉक्‍टरांवर आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : खासगी दवाखान्यात प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तशी तक्रार संबंधित महिलेच्या भावाने धुळे शहर पोलीस ठाण्यात दिली. महिलेच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या ठिकाणी नातेवाइकांची गर्दी झाली होती. 

रुपेश दिलीप बेंद्रे (रा.वलवाडी, मराठी शाळेजवळ, गोंदूररोड) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की बहीण ऋतुजा संदीप घोगरे (वय २१, रा. इंदापूर, जि. पुणे) बाळंतपणासाठी दोन महिन्यांपूर्वी माहेरी आलेली होती. बाळंतपणाच्या अनुषंगाने ती येथील शहरातील एका हॉस्पिटलमधील औषधोपचार घेत होती. दरम्यान ७ नोव्हेंबरला सकाळी तिला प्रसूतीसाठी संबंधित खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने साडेपाचला शस्त्रक्रिया (सीझर) करण्याचा निर्णय झाला. सहा वाजून १७ मिनिटांनी सिझर झाले. बहिणीने मुलाला जन्म दिला. जन्मलेल्या बाळाला उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. 

इंजेक्‍शन दिले अन्‌
दरम्यानच्या काळात ऋतुजाला कंबरदुखीचा त्रास होत असल्याने डॉक्टर मॅडमच्या सूचनेनुसार तेथील नर्सने ऋतुजाला इंजेक्शन दिले. आम्ही दवाखान्यात आलो त्यावेळी मात्र, बहीण ऋतुजा मयत झालेली दिसली. चुकीचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला असावा, सिझर झाल्यानंतर डॉक्टर मॅडम पेशंटजवळ न थांबता घरी निघून गेल्या, डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणामुळे बहीण ऋतुजाचा मृत्यू झाला असा आरोप रुपेश बेंद्रे यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.