esakal | दीड वर्षापूर्वी हरवली..आणि प्रामाणिकपणामूळे सुखरूप मिळाली
sakal

बोलून बातमी शोधा

ring

दीड वर्षापूर्वी हरवली..आणि प्रामाणिकपणामूळे सुखरूप मिळाली

sakal_logo
By
विनोद शिंदे

कुसुंबा (ता. धुळे) : सध्या प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना काही बोटांवर मोजण्याइतकी माणसे प्रामाणिक आहेत. मग तो कुठल्याही धर्माचा असो... याचा प्रत्यय नुकताच कुसुंबा येथील हॉटेल व्यावसायिक चेतन जयराम चौधरी यांना आला.

हेही वाचा: धुळे सिव्हिलचा साठा संपला; हिरे मेडिकलला तुटवडा

चेतन चौधरी ७ फेब्रुवारीला २०२० ला वाढदिवसानिमित्त धुळ्यातील मौलवीगंज भागातील हॉटेल शगुप्तावर जेवणासाठी गेले होते, जेवण आटोपून ते घरी आले, तेव्हा बोटातील साडेचार ग्रॅमची सोन्याची अंगठी हरविल्याचे लक्षात आले. ठिकठिकाणी तपास केला असता अंगठी मिळून आली नाही. हरवलेली वस्तू सापडणार नाही म्हणून विषय सोडून दिला. दीड वर्षानंतर त्याच हॉटेलवर मित्रांसोबत जेवायला गेले असता, चौधरी यांनी गेल्या दीड वर्षापूर्वी याच हॉटेलमधून जेवण करून गेल्यानंतर सोन्याची अंगठी हरविल्याचे मुस्लिम बांधव असणारे हॉटेल शगुप्ताचे जिया भाई यांना बोलून दाखविले, त्याच वेळी जियाभाई यांना ७ फेब्रुवारी २०२० ला हॉटेलच्या बेसिनखाली अंगठी सापडली होती. त्यानंतर कुणीही तपास करायला आले नाही. ज्याची कुणाची असेल तो निश्चित येईल असे नेहमी वाटत होते. आम्ही ती जतन करून ठेवलेली आहे. चेतन चौधरी यांनी घरून सोन्याच्या अंगठीची मूळ पावती मागवून खात्री करून दिली असता जिया भाई यांनी सांभाळलेली अंगठी प्रामाणिकपणे परत केली व अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले.

हेही वाचा: धुळ्यात ‘संचारबंदी’ची लागली वाट; ‘तू तू, मैं मैं’ आणि खोळंबा !

-सुमारे दीड वर्षापूर्वी हॉटेलमध्ये बेसिनच्या खाली सोन्याची अंगठी सापडली. तेव्हापासून मनात होते ज्याची असेल, तो निश्चित येईल. आम्ही सुवर्णकारांकडेही गेलो मात्र ट्रेस लागला नाही. माझी आई, भाऊ यांनीही सांगितले की संभाल कर रखो ‘जिसका होगा, ओ जरूर आयेगा और ले जायेगा.’ हमारे धर्मगुरूही वही बोलते हैं. आईजवळ अंगठी सांभाळून ठेवली होती. नियत अच्छी तो सब अच्छा है. रोजा चालू आहे अशात चांगले काम झाले समाधान वाटले.

-जियाभाई अन्सारी, मालक, शगुप्ता हॉटेल, मौलवीगंज, धुळे

मला स्वप्नातही वाटत नव्हते, की अंगठी परत मिळेल मात्र जियाभाई यांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. यासाठी मुश्ताक शेख यांचेही सहकार्य लाभले.

-चेतन चौधरी, रवींद्र रेस्टॉरंट, कुसुंबा

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image