esakal | Dhule: साक्रीत महाविकास आघाडीचा फायदा तर भाजपचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

Dhule: साक्रीत महाविकास आघाडीचा फायदा तर भाजपचे नुकसान

sakal_logo
By
धनजंय सोनवणे

साक्री : तालुक्यात पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) 9 गणामधील पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात चार ठिकाणी महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi), दोन ठिकाणी भाजपचे (BJP) उमेदवार विजयी झाले तर तीन जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. या निवडणुकीत (Election) महाविकासआघाडीचा फायदा झाला आहे तर भाजपच्या मात्र जागा तीन जागा कमी झाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Jalgaon:पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे जम्मू काश्मीर येथे शहिद


तालुक्यातील पंचायत समितीच्या 9 गणांसाठी पोटनिवडणूक होत होती. यात आज लागलेल्या निकालांमध्ये शिवसेना तीन, राष्ट्रवादी काँग्रेस एक, भाजप दोन तर अपक्ष तीन ठिकाणी विजय झाले. यात गेल्या वेळी रद्द झालेल्या जागांमध्ये शिवसेनेची एक तर सहयोगी एक अशा दोन जागा कमी झाल्या होत्या मात्र आजच्या निकालात कासारे, म्हसदी व बळसाने गणात शिवसेना उमेदवार विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा फायदा झाला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने धाडणे गणात विजय मिळवला आहे. काँग्रेसने मात्र दुसाने गणातील आपली जागा गमावली असून भाजपने पिंपळनेर व घाणेगाव येथे विजय मिळवला असला तरी कासारे, बळसाने व धाडणे येथील आधीच्या जागा मात्र गमावल्याने त्याच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. तर जैताने, दुसाने व चिकसे गणात अपक्ष उमेदवारांनी बाजी मारल्याने हे सदस्य कोणाला पाठिंबा देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी गोविंद दाणेज, तहसीलदार प्रविण चव्हाणके, अप्पर तहसीलदार विनायक थविल, नायब तहसीलदार गोपाळ पाटील, जयवंत पाटील, सुभाष गिरी आदींनी मेहनत घेतली तर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा: ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम


पंचायत समिती गणनिहाय विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
दुसाने - रवींद्र खैरनार 2288, बळसाने - महाविर जैन 2942, घाणेगाव - रोहिदास महाले 2974, जैताने - सोनाली पगारे 2717, पिंपळनेर - देवेंद्र गांगुर्डे 2477, चिकसे - रोशणी पगारे 2174, धाडणे - मंगलाबाई भामरे 4105, कासारे - माधुरी देसले 2728, म्हसदी - अर्चना देसले 4046.

loading image
go to top