esakal | दुकाने बंद..वस्तरा फिरेना, मदत मिळेना आणि कोरोना जाईना !
sakal

बोलून बातमी शोधा

shaving

दुकाने बंद..वस्तरा फिरेना, मदत मिळेना आणि कोरोना जाईना !

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

त-हाडी : एप्रिल महिना सरत आल्याने उन्हाळा जोर वाढायला सुरुवात झाली असून डोक्यावरील केस वाढल्याने नागरिक पुरते हैरान झाले आहेत. संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सर्वच सलून बंद आहेत.अशा परिस्थितीत सलूनमधील कारागीर, चालक व मालक हे आर्थिक संकटात सापडल्याने सलूचालकांच्या व्यवसायावर कात्री पडली असून महाराष्ट्र नाभिक महामंडळाने मुख्यमंत्र्यांकडे आर्थिक मदतीसाठी साकडे घातले आहे.

हेही वाचा: सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

राज्यात 5 लाख दुकाने असून सुमारे 21 लाख कारागिर दुकाने बंद करून घरी बसले आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागात अनेकांचे या धंद्यावर हातावर पोट आहे. ग्रामीण भागातील सलून कारागीर दिवसाला तीनशे ते चारशे रुपयांचा व्यवसाय करतात. तालुकास्तरावरील कारागीर सातशे ते आठशे रुपये आणि शहरी भागातील एक कारागीर सरासरी बाराशे ते दीड हजार रुपयांचा व्यवसाय करतात काही ठिकाणी 50 टक्के भागिदारी तर काही ठिकाणी कारागीर पगारावर काम करतात. दुकान चालकांना कारागिराच्या पगारासह दुकानाचे भाडे, वीजबिल, कर यासह विविध देणी भागवावी लागतात. त्यामुळे रोजच्या मजुरीवर पोट भरणाऱ्या सलून चालकांना आता उधारीवर धान्य मिळणे कठीण झाले आहे.

हेही वाचा: वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’

सलून चालक आथिर्क संकटात

सलून चालकांसमोर स्वत:चे घर चालवताना दुकानाचे भाडे, वीज देयक, कर, कारागिरांचे वेतन अशा सर्वच बाजूने आर्थिक संकट घोंगावत आहे. त्यात संचारबंदी संपल्यानंतरही ग्राहक सलूनमध्ये येतील का? ही दुसरी समस्या सलून चालकांसमोर आहे. त्यामुळे सरकारनेच काहीतरी पर्याय काढावा. तसेच शहरी व ग्रामीण भागातील सलून व्यवसायावरील 18 टक्के जीएसटीत कपात करून 5 टक्के करावा, अशा विविध मागण्यांवर सरकारने काम करण्याची गरज असल्याचीही नाभिक संघटनेची मागणी आहे.

दहा हजाराची मदत द्यावी

संघटनेच्या वतीने सलून चालक आणि कारागिरांची यादी शिरपूर तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला पाठवणार असून ठप्प झालेल्या सलून व्यवसायाला ऊर्जा देण्यासाठी सरकारने संचारबंदी काळात सलून चालक व कारागिराला 10 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. तसेच शासनाने योग्य अंतर ठेवून केशकर्तन करण्याची परवानगी दिली तर सलून व्यवसाय आणि नागरिक यांच्या दुहेरी समस्या सुटतील असे सलुन चालकांकडून बोलले जात आहे.

हेही वाचा: राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

महिना 10 हजार खात्यावर सोडावे

कोरोनामुळे नाभिक समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली असून त्यामधून सुटण्यासाठी घरोघरी जाऊन काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा महिना दहा हजार रुपये सर्व नाभिक बांधवांच्या खात्यावर सोडावे यासाठी आपले सरकार कडे मागणी करणार आहे

-काशिराम पावरा, आमदार शिरपूर विधानसभा

नियम व अटींवर परवानगी हाच उपाय...

ज्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून सलून सुरू करण्यास परवानगी देणे गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात केस वाढल्यामुळे लहान मुलांसह प्रौढानांही डोक्यावर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे शासनाने हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी सुरक्षेचे नियम घालून किमान केस कर्तनासाठी परवानगी देण्याचा विचार करावा.

- राहुल सौदाणे, सलून चालक

अशाप्रकारे देता येईल परवानगी...

1) सोशल डिस्टसिंगसाठी तीन खुर्च्या असलेल्या सलूनमधील केवळ एक किंवा दोनच खुच्या सुरू ठेवता येतील.

2)अपॉईटमेंट घेऊनच केस कटींग करता येईल, जेणेकरून गर्दी होणार नाही.

3)सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकाच्या शरिराचे तापमान मोजूनच त्यास दुकानात प्रवेश देण्यात येईल.

4)ग्राहक बसलेल्या खुर्चीसह कटींगसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करता येईल.

संपादन- भूषण श्रीखंडे