esakal | वाळू माफियांची मुजोरी, चक्क अपर तहसीलदारांनाच धक्‍काबुक्‍की

बोलून बातमी शोधा

null
वाळू माफियांची मुजोरी, चक्क अपर तहसीलदारांनाच धक्‍काबुक्‍की
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा ः मालपूर (ता. शिंदखेडा) येथील नाय नदीवरून कर्ले येथील प्रवीण देवरे, अनिल देवरे यांचे वाहनचालक विनापरवानगी वाळूची चोरटी वाहतूक करीत होते. त्यांनी अपर तहसीलदार महाजन व सोबतच्या वाहनचालकाला धक्काबुक्‍की करून शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणल्याने येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: लग्नाच्या अक्षदा पडणार..तोच हातात पडली दंडाची पावती !

मालपूर शिवाराच्या कर्ले रस्त्यावरील नाय नदीपात्रात बुधवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याच्या माहितीवरून वेशांतर करून अपर तहसीलदार महाजन, त्यांचे वाहनचालक युवराज माळी खात्री करण्यासाठी नाय नदीवर गेले. तेथे सात ते आठ जण टिकाव, फावड्याचा वापर करून उभ्या असलेल्या दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत होते.

हेही वाचा: गाव वीस..आणि आरोग्याचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर !

शिवीगाळ करत केली धक्काबुक्की

त्यांच्याकडे वाळूउपशाबाबत परमिट आहे का? कोणती कागदपत्रे आहेत? ते दाखवा, असे त्यांना सांगितले. मात्र, ट्रॅक्टरमालकांच्या सांगण्यावरून आलो आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच त्यांची व मालकांची नावे सांगण्यास नकार दिला. पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर घ्या सांगितल्यावर ते निघून गेले. नंतर तेथे प्रवीण देवरे, अनिल देवरे आले. त्‍यांनी अपर तहसीलदार महाजन यांना शिवीगाळ करत धक्काबुक्‍की केली. याबाबत येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.