esakal | गाव वीस..आणि आरोग्याचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर !

बोलून बातमी शोधा

null
गाव वीस..आणि आरोग्याचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर !
sakal_logo
By
धनराज माळी

वडाळी ः वडाळी (ता. शहादा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार केवळ सहा कर्मचाऱ्यांवर आहे. या केंद्रांच्या अखत्यारीतील १५ ते २० गावात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. जवळच्या कोंढावळ गावातील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हा संसर्ग खैरवे- भडगाव येथेही असून अनेकजण पॉझिटिव्ह आहेत. अर्थातच आरोग्य विभाग अनेकविध उपाययोजना करीत असला तरी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अवघे सहा कर्मचारी परिसरातील वीस गावांचा गाडा ओढत आहेत.

हेही वाचा: हे आहेत भारतातील 10 सर्वोत्तम विवाहासाठी स्थाने

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्याला मदत होईल. कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी सरपंच रामसिंग ठाकरे, पोलिसपाटील गजेंद्रगीर गोसावी, उपसरपंच हिंमत सोनवणे यांनी केली आहे. या केंद्रातील कमी कर्मचारी संख्येमुळे कोविड टेस्ट, लसीकरण करणेसाठी अडथळा येत आहे. शहादा- शिरपूर महामार्गाजवळच असलेल्या वडाळी गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेकदा मागणी करूनही वडाळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवली जात नसल्याने अवघ्या सहा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. कोरोनाचा उद्रेक वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने या आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवावी. कोविड टेस्ट करण्याबरोबरच लसीकरण करून आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा: भुसावळ पालिकेत खडसे गटाचा वरचष्मा, प्रमोद नेमाडे बिनविरोध

वडाळी उपकेंद्रात लसीकरण सुरू असून काही कर्मचारी याठिकाणी असतात, तर काही कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात कार्यरत आहेत. गावात रुग्णांची संख्या पाहण्यासाठी शिक्षक व कर्मचारी गल्ली बोळात फिरत आहेत. १ मे पासून १८ वर्षातील सर्वांना लसीकरण मोफत करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. अश्यावेळी कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या आवश्यक आहे. ती वाढविण्यात यावी.

-गिरीष जगताप, माजी पंचायत समिती सदस्य

संपादन- भूषण श्रीखंडे