साताऱ्यातील बालकाचे केले अपहरण... पण हिंदीतील संभाषणाने पकडला गेला 

जगन्नाथ पाटील
Sunday, 7 June 2020

उत्तर प्रदेशमधील जलालपूर येथील तेवीस वर्षीय लवकुश राजाराम हा सातारा येथे बऱ्याच वर्षांपासून कामाला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद पडले आहे. गावी परतांना हाती पैसे नव्हते. तसेच इतर कारणांसाठी त्याने सातारा येथील गिरीराज पाटील या बालकाचे अपहरण केले. विविध वाहनांच्या माध्यमातून तो नगावपर्यंत पोहचला होता. 

 
कापडणे : नगाव (ता. धुळे) येथील एका हॉटेलवर तेवीस वर्षीय युवक व एक तीन वर्षीय बालक सकाळी नऊच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबले होते. बालक मराठीतून तर युवक हिंदीतून बोलत होता, बालकाचा चेहरा मात्र रडवेला होता. संबंधित बालकाचे साताऱ्याहून अपहरण झाल्याचे नंतर समोर आले. नगाव (ता. धुळे) येथील युवकाच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेले बालक त्याच्या आई-वडीलांकडे सोपविले. 

उत्तर प्रदेशमधील जलालपूर येथील तेवीस वर्षीय लवकुश राजाराम हा सातारा येथे बऱ्याच वर्षांपासून कामाला आहे. लॉकडाऊनमुळे काम बंद पडले आहे. गावी परतांना हाती पैसे नव्हते. तसेच इतर कारणांसाठी त्याने सातारा येथील गिरीराज पाटील या बालकाचे अपहरण केले. विविध वाहनांच्या माध्यमातून तो नगावपर्यंत पोहचला होता. 

हिंदी- मराठीमुळे आला संशय 
नगावला हॉटेल जवळून दिनेश माळी मित्रांसह जात होता. तेव्हा लालू त्या बालकाला हिंदीत संतापात समजवित होता. ते तीन वर्षीय बालक रडविले होवून मराठीत बोबडे बोलत होते. ही बाब दिनेश माळीच्या लक्षात आली. काही तरी गडबड असल्याची शंका आल्याने दिनेशने त्या युवकाला थेट विचारलेच. तू कोण, हा मुलगा कोण. मग काय घाबरतच माझा भाचा असल्याचे त्या तरुणाने सांगितले. मराठी कसे बोलतो... असे म्हणत धमकावले. अन त्याने बालकाचे अपहरण केल्याचे कबुल केले. बालकाला दिनेशच्या मित्रांनी ताब्यात घेतले. 

आवर्जून वाचा -शिक्षकेतर म्हणताहेत काम करणार नाही... का ते जाणून घ्या

....पण त्याला सोडून द्या ? 
अधिक धमकाविल्यानंतर बालकाचे आई-वडिल नितीन पाटील व चंदना पाटील यांचा भ्रमणदूरध्वनी क्रमांक दिला. बालक व्हिडीओ कॉलींगने आई-वडिलांशी बोलला. तेव्हा तिघे ओक्‍साबोक्‍सी रडले. तेवढ्यात अपहरणकर्ता पळण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला पकडून ठेवले. मात्र, बालकाच्या आई-वडिलांनी त्याला सोडून द्या. आमचा मुलगा आम्हाला मिळाला. पोलिस भानगडीत पडायचे नाही, असे सांगितले. 

दरम्यान आज (ता. 7) पहाटे सहाला पाटील दाम्पत्य नगावला दाखल झाले. अन्‌ गिरीराजला सुखरुप बघताच त्यांनी हंबरडा फोडला. दिनेश माळी व त्यांच्या मित्रांचे आभार मानत, हे पाठील दाम्पत्य आपल्या पो'टच्या गोळ्याला घेऊन गावाकडे परतलेत. दिनेशसह मित्रांना एकाच दिवसात बालकाचा लळा लागला होता. माळी व त्यांच्या मित्रांच्या समयसुचकतेचे परीसरातून कौतूक होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule satara child kidnap and kidnaper coming nagaon village