खानदेशात जिल्हा परिषदेच्या सतरा ‘मॉडेल शाळा’ 

जगन्नाथ पाटील 
Tuesday, 27 October 2020

मॉडेल शाळा होय. येथे विद्यार्थ्यांसाठी ताणतणावविरहित वातावरण असेल. एकविसाव्या शतकातील कौशल्ये नवनिर्मितीला चालना, समीक्षात्मक प्रवृत्ती, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानात्मक मूल्ये अंगी वाढीस लावले जाणार आहेत.

कापडणे  : राज्यातील जिल्हा परिषदेच्या तीनशे प्राथमिक शाळा ‘मॉडेल शाळा’ करणार आहे. धुळे चार, नंदुरबार एक, जळगाव बारा व नाशिक जिल्ह्यातील १३ मॉडेल शाळा करण्यासाठी निवड झाली आहे. या शाळांची भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाबींची गुणवत्ता वाढविली जाणार आहे. 

आवश्य वाचा- दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

मॉडेल शाळांमधील सुविधा 
स्वतंत्र शौचालय, आकर्षक इमारत, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, सुस्थितीत वर्ग आदी भौतिक सुविधांची उपलब्धता होणार आहे. शैक्षणिक वातावरण विकसित करणे, वाचनावर भर देणे, गणिताचे मूलभूत संबोध व संकल्पना पक्क्या करणे. स्वयम अध्ययनावर भर देणे. संदर्भ ग्रंथांचा वापर करणे, शालेय वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला रविवारी आणि इतर सुटीच्या दिवशीही शाळेत यावेसे वाटेल, यासाठी आनंददायी शिक्षण विकसित केले जाणार आहे. प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम राबविला जाणार आहे. 

कौशल्ये विकसित करणारी शाळा 
मुख्य विषयांसह अन्य विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून देणारी तसेच विविध क्षेत्रांतील कौशल्ये विकसित करणारी शाळा म्हणजे आदर्श तथा मॉडेल शाळा होय. येथे विद्यार्थ्यांसाठी ताणतणावविरहित वातावरण असेल. एकविसाव्या शतकातील कौशल्ये नवनिर्मितीला चालना, समीक्षात्मक प्रवृत्ती, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानात्मक मूल्ये अंगी वाढीस लावले जाणार आहेत. काम करण्याचे संभाव्य कौशल्ये विकसित केली जातील. 

‘त्या’ शिक्षकांची पाच वर्षे ‘नो बदली’ 
मॉडेल शाळांमध्ये असलेल्या शिक्षकाला पाच वर्षे बदली करता येणार नाही. क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायनासह इतर विषयांमध्ये तरबेज असणाऱ्या शिक्षकांची व तशी तयारी असणाऱ्या शिक्षकांची मॉडेल शाळांमध्ये वर्णी लागणार आहे. 

खानदेशातील निवड झालेल्या जिल्हा परिषद शाळा (तालुका- गाव) 
धुळे- धामणगाव, शिंदखेडा- पढावद, साक्री- बाभुळदे, शिरपूर- खैरखुटी, धडगाव- लहान सुरवानी, पारोळा- विचखेडे, मुक्ताईनगर- टाकळी, अमळनेर- गडखांब, भडगाव- भडगाव, बोदवड- जामठी, चाळीसगाव- माळशेवगे, चोपडा- गरताड, धरणगाव- चोरगाव, जळगाव- कानळदा, पाचोरा- पुनगाव, यावल- नायगाव, भुसावळ- वरणगाव  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Seventeen 'Model Schools' of Zilla Parishad in Khandesh