शिंदखेडा तालुक्‍यासाठी सूतगिरणीला मिळाली मंजुरी : मंत्री जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

धुळे ः जिल्ह्यात अवर्षणग्रस्त शिंदखेडा तालुक्‍यासाठी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने आज सूतगिरणी उभारणीला मंजुरी दिली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ, तर शेकडो हातांना रोजगाराची संधी मिळणार असल्याची माहिती शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.  

धुळे आणि शिरपूर तालुक्‍यातील नेत्यांनी कापूस उत्पादकांना बाजारपेठ मिळावी म्हणून सूतगिरणी उभारली. त्यात शिंदखेडा तालुक्‍यात सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांना तालुक्‍यात सूतगिरणीअभावी शिरपूर, धुळे, शहादा येथे कापूस विक्रीसाठी जावे लागते. प्रसंगी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करावा लागतो. ही स्थिती बदलावी म्हणून पाच वर्षांपासून मंत्री रावल यांनी शिंदखेडा तालुक्‍यात सूतगिरणी मंजुरीचा विडा उचलला. यासंबंधी प्रस्तावास कॅबिनेट मंत्रिमंडळाने बैठकीत मंजुरी दिली. याद्वारे पाठपुरावा फलदायी ठरल्याचे, शेतकऱ्यांना दिलासा, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. तालुक्‍यातील नरडाणा "एमआयडीसी'त पाच हजार कोटीची गुंतवणूक असलेले प्रकल्प आणि आता सूतगिरणी होणार असल्याने बेरोजगारी कमी होऊ शकेल, असा विश्‍वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला. 

Web Title: marathi news dhule shindkheda sutgirni raval