esakal | ग्रामीण भागातील ६० शाळांमध्ये पुन्हा होणार किलबिलाट
sakal

बोलून बातमी शोधा

school open

शिंदखेडा तालुक्यातील नववी ते बारावी पर्यतचे 99 शाळापैकी 60 शाळेची तयारी पूर्णत्वास आली आहे. तसेच पाच शाळेतील पाच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ग्रामीण भागातील ६० शाळांमध्ये पुन्हा होणार किलबिलाट

sakal_logo
By
विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : शासनाने नववी ते बारावीपर्यत माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा सुरू सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे; अशा ठिकाणच्या शाळा पुढील आदेश येईपर्यत उघडणार नसल्याचे शिंदखेडा पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी एफ. के. गायकवाड यांनी सांगितले. परंतु, ग्रामीण भाागतील साठ शाळांची घंटा वाजणार आहे.  
शिंदखेडा तालुक्यातील नववी ते बारावी पर्यतचे 99 शाळापैकी 60 शाळेची तयारी पूर्णत्वास आली आहे. तसेच पाच शाळेतील पाच शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील 34 व पाच शाळेतील पॉझिटिव्ह आलेल्या अशा एकूण 39 शाळा वगळण्यात आल्या आहेत. तसेच ज्या पाच शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत; अशा शाळाही पंधरा दिवस बंद राहणार आहेत. सोमवारी एकून 60 शाळा सुरू होतील. 

चौदाशे कर्मचाऱ्यांची तपासणी
शिंदखेडा तालुक्‍यातील 915 शिक्षक व 491 शिक्षकेतर कर्मचारी असे ऐकूण 1406 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात पाच शिक्षक कोरोना पोजिटिव्ह आढळून आले आहेत. त्या शिक्षकांना 15 दिवस कॉरंटाईन करण्यात आले आहे. 

पन्नास टक्‍केप्रमाणे एक दिवसाआड येणार विद्यार्थी 
तालुक्यातील नववीत सहा हजार 160, दहावीत सहा हजार 170, अकरावीत तीन हजार 473 व बारावीतील तीन हजार 278 असे एकूण 19 हजार75 विद्यार्थी आहेत. या ऐकूण विद्यार्‍थ्‍यांपैकी पन्नास टक्केच विद्यार्थी दररोज एक दिवसाआड येणार असून 915 शिक्षकांपैकी ही निम्मेच शिक्षक एक दिवसाआड येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगितले. त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य असून त्यांना माक्स त्या त्या शाळेने पुरविणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी दररोज शाळेत असल्यावर त्याची नियमित तपासणी गेटवरच तपासणी होणार आहे. वर्गातही एका बेंच वर एक विद्यार्थी बेंच सोडून वर्गात येणार आहे. यासाठी सर्वच शाळा कामाला लागल्या असून शाळा श्यानेटरीचकरण्याचे करण्यात आल्या आहेत.

‘शासनाने जरी शाळा सुरु करवायच्या निर्णय घेतला असला तरी विद्यार्थी हित लक्षात घेता खबरदारी घ्यावी तरच मुलांना शाळेत पालक शाळेत पाठवतील.
- किशोर कोळी, पालक, दलवाडे (प्र.सोनगीर). 

‘शासनाने शाळा सुरु करण्या पूर्वी सॅनेटाइजर , मास्क,हैंडवाश व स्टेशनरी या साठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच शिक्षक यांना सुध्दा एका दिवस आडाने शाळेत येण्याची सक्ती करावी. सॅनेटाईजर एका दिवसा आड करून आणि विद्यार्थ्यांची कोविड 19ची चाचणी करून घ्यावी.
- नरहर इंदासराव, मुख्याध्यापक, जनता विद्या प्रसारक मंडळ, चिमठाणे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image