धास्तावलेल्या शिरपूरमध्ये पाच दिवस "जनता कर्फ्यू' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

सकाळ वृत्तसेवा 
शिरपूर,ः धुळे शहरापाठोपाठ शिरपूर शहरातही कोरोनाने मजबूत पाय रोवल्याने रुग्ण संख्येने शतक ओलांडले आहे. त्यामुळे शिरपूरकर नागरिक धास्तावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध व्यावसायिकांनी मिळून 17 जून ते 21 जूनपर्यंत "जनता कर्फ्यू' लागू करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउन हटविल्यानंतर शहरातील हा दुसरा "जनता कर्फ्यू' आहे. 

शहरात कोरोना रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली असून 11 जणांचा बळी गेला आहे. त्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या आणि संसर्गाची व्याप्ती वाढत असल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे. मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेत्यांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. यामुळे व्यापारी संघटना, किरकोळ व ठोक विक्रेत्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आबा महाजन, पालिका मुख्याधिकारी अमोल बागूल यांची भेट घेऊन जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय सांगितला. त्यानुसार 17 ते 21 जून या कालावधीत शहरातील व्यवहार बंद ठेवले जातील. बाजारपेठेतील कृषी केंद्र व मेडिकल स्टोअर्स सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत सुरू राहतील, तर हॉस्पिटल व त्यांना संलग्न असलेल्या मेडिकल स्टोअर दिवसभर खुली राहतील. 

विकास आघाडीचा विरोध 
दरम्यान, शिरपूर विकास आघाडीचे ऍड. अमित जैन यांनी जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाने लॉक डाउन हटवले. परंतु स्थानिक प्रशासन स्वतःचे अपयश झाकण्यासाठी जनता कर्फ्यूचा आधार घेत आहे. याविरोधात प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पोलिस संरक्षणात दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मागितली जाईल, असे त्यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule shirpur janata curfew