esakal | चार लाखाच्या ऊसाचा क्षणात कोळसा 
sakal

बोलून बातमी शोधा

shortcirckit and sugar

ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला. शॉर्टसर्किटमुळे ऊस पेटण्याचा धोका असल्याची माहिती वीज वितरण कंपनीला दिली होती.

चार लाखाच्या ऊसाचा क्षणात कोळसा 

sakal_logo
By
दगाजी देवरे

म्हसदी (धुळे) : वसमार (ता. साक्री) शिवारात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस खाक झाला. सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
वसमार शिवारातील डीपीवर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुशीलाबाई सजन नेरे यांचा चार एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला. वसमार शिवारातील गट क्रमांक १७४, १७५, १७६, १७७ या चार एकर क्षेत्रातील उसाने पेट घेतला. त्यात ऊस जळून खाक झाला. उसाचे चार लाख व ऑनलाइन ठिबक नेटाफिमचे दोन लाखांचे नुकसान झाले, असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले. परिणामी, ऊस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला. शॉर्टसर्किटमुळे ऊस पेटण्याचा धोका असल्याची माहिती वीज वितरण कंपनीला दिली होती. अनेक वेळा माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने नुकसान झाल्याचे श्रीमती नेरे यांचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांचा आग विझविण्याचा प्रयत्न 
ऐन ऊस तोडणीवर आला असताना मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे कळताच जवळपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. चार एकर ऊस, ठिबक सिंचन नेटाफिमचे साहित्य जळून खाक झाले. संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. जळीत उसाच्या क्षेत्राचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त महिला शेतकऱ्याने केली आहे. 
 
महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याविषयी अनेक वेळा सांगूनही दुर्लक्ष केल्याने मोठे नुकसान झाले आहे. वीज कंपनीने भरपाई द्यावी. 
-व्यंकट सजन नेरे, म्हसदी 
 
संबंधित शेतकऱ्यास डीपीलगतच्या क्षेत्रात ऊसलागवड करू नये, अशी सूचना दिली होती. कारण डीपीजवळ अशा पिकांची लागवड केली जात नाही. शेतकऱ्याने लागवडीपूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. 
-योगेश खैरनार, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र, म्हसदी 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image