esakal | धुळ्याचा नावलौकिक सातासमुद्रापार...डॉ. स्मिता मोहिते ठरल्या 'मिसेस इंडिया युके' 
sakal

बोलून बातमी शोधा

mrs india uk

इंग्लंड(युके) येथे आयोजित सौदर्यंवतींच्या स्पर्धत तीनशे सौदर्यवती स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सौंदर्य, बुद्धिमत्ता, वक्तृत्व, सामाजिक योगदान आदी बाबींचा निकष ठेवण्यात आला होता.

धुळ्याचा नावलौकिक सातासमुद्रापार...डॉ. स्मिता मोहिते ठरल्या 'मिसेस इंडिया युके' 

sakal_logo
By
विनोद शिंदे

कुसुंबा (ता. धुळे) : लंडन येथील एजीपीएल एंटरप्रायझेस यांनी आयोजित केलेल्या सौंदर्यवती स्पर्धा नुकत्याच झाल्या. त्यात धुळ्याच्या डॉ. स्मिता मोहिते(पवार) यांनी प्रथम क्रमांकाने ‘मिसेस इंडिया युके’चा बहुमान पटकावून सातासमुद्रापार धुळ्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. 
इंग्लंड(युके) येथे आयोजित सौदर्यंवतींच्या स्पर्धत तीनशे सौदर्यवती स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सौंदर्य, बुद्धिमत्ता, वक्तृत्व, सामाजिक योगदान आदी बाबींचा निकष ठेवण्यात आला होता. धुळे येथील व सद्या इंग्लंड येथे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्‍ज्ञ असलेल्या डॉ. स्मिता प्रशांत मोहिते (पवार) यांना स्पर्धे दरम्यान परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. स्मिता यांनी प्रसंगावधान राखत अचूक उत्तरे देत ही स्पर्धा जिंकून ‘मिसेस इंडिया युके’चा प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना स्पर्धा व्यवस्थापकांकडून ‘मिसेस इंडिया युके’चा बहुमानाकिंत मुकुट चढवून, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात आली. अंजिम स्पर्धा १६ ऑगस्‍टला झाली. 
डॉ. स्मिता मोहिते (पवार) यांनी महाविद्यालयीन शिक्षण धुळे येथील जयहिंद महाविद्यालयांत घेतले असून, भारतात एमबीबीएस, एम.डी. झाल्यानंतर लंडन येथे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्‍ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. प्रशांत मोहिते हे देखील सुप्रसिद्ध हृदय प्रत्यारोपण तज्‍ज्ञ आहेत. धुळ्यातील ॲड. भालचंद्र पवार, उषा पवार यांच्या त्या कन्या आहेत. कुसुंबा (ता. धुळे) येथील माजी जिल्‍हा परिषद सदस्य प्रा. दिलीप शिंदे व शिंदे विद्यालयाचे उपशिक्षक मनोहर शिंदे यांच्या त्या भाची आहेत. त्‍यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 

loading image