esakal | जामफळ धरण भरले शंभर टक्के 
sakal

बोलून बातमी शोधा

jamfad dam

यंदा तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता कमीच आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता एस. बी. पढ्यार यांनी सांगितले.

जामफळ धरण भरले शंभर टक्के 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनगीर (धुळे) : तालुक्यात शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री सर्वत्र जोरदार पाऊस पडला. आतापर्यंत सरासरी ८९३ मिलिमीटर पाऊस पडला असून, नद्या, नाले, तलाव, धरण ओव्हरफ्लो झाले आहेत. परिणामी, यंदा तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता कमीच आहे, असे ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता एस. बी. पढ्यार यांनी सांगितले. 

धुळे, लामकानी, कापडणे, नेर, कुसुंबा, शिरूड आदी प्रमुख गावांसह परिसरात शनिवारी (१९ सप्टेंबर) रात्री जोरदार पाऊस पडला. तालुक्यात धुळे येथे ८५ मिलिमीटर, लामकानी- २६ मि.मी., सोनगीर- २४ मि.मी, नगाव- २८ मि.मि, कुसुंबा- 130१३० मि.मी., नेर- ९५ मि. मी., मुकटी- ३५ मि. मी., बोरकुंड- १८ मि.मी., पुरमेपाडा- ३६ मि. मी., खेडे- १२४ मि.मी., विंचूर- १० मि. मी., तर नवलनगर- २४ मिलिमीटर असा सरासरी ५२.९१ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत खेडे, कुसुंबा, नेर, धुळे परिसरात सर्वाधिक पाऊस पडला असून, अनुक्रमे १७७६, १३५०, ११६०, १००१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर सर्वांत कमी पाऊस लामकानी परिसरात झाला असून, तो आतापर्यंत २७१ मिलिमीटर आहे. आतापर्यंत सोनगीर (५९३ मिलिमीटर), नगाव (८२४ मिलिमीटर), मुकटी (४८३ मिलिमीटर), पुरमेपाडा (९९४ मिलिमीटर), नवलनगर (६८८ मिलिमीटर), बोरकुंड (७८६ मिलिमीटर), विंचूर (७९१ मिलिमिटर) येथे तुलनेत मध्यम पाऊस झाला. 

पाण्याचा प्रश्‍न सुचला
तालुक्याला बोरी व पांझरा या नद्यांचा मोठा किनारा लाभला असून, दोन्ही नद्यांवर ठिकठिकाणी केटीवेअर बनविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप पाणी अडविण्यात आलेले नाही. अक्कलपाडा, कनोली, देवभाने, आर्वी, जामफळ धरण शंभर टक्के भरले आहेत. धामणगाव येथील तनिष्का तलाव, सोनगीरचा पाझर तलाव, बुरझड येथील सातपायरी धरण, जापी, सायने येथील तलाव भरलेले असून ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळ्यातही तालुक्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. गेल्या वर्षी दहा गावांना टंचाई जाणवेल, अशी अपेक्षा असताना केवळ पाच गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली. तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. यंदा सुदैवाने टंचाई जाणवणार नसल्याने प्रशासनाने सुटकेचा श्‍वास सोडला आहे. 

loading image